महाराष्ट्र वेदभुमी

खा. सुनिल तटकरेंच्या दूरदृष्टीमुळे रोह्यातील विविध विकासकामे मार्गी ? आ. अनिकेत तटकरे


प्रतिनिधी - शुभ्रा आडाव चणेरा 

रोह्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन

गेल्या अनेक वर्षाच्या कालखंडात खा. सुनिल तटकरेंच्या माध्यमातून अनेक विकासकामे पूर्ण करण्यात यश आले. रोह्यातील एकही वाडी, वस्ती, मोहल्ला विकासकामांत शिल्लक राहिलेला नाही, आज कळत नकळत विकासकामात काही उणीवा राहिल्या असतील, पण जे काही करता येईल ते प्रामाणिकपणे करण्याची भूमिका खा. तटकरेंच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला गेला... एक बाजूला कुंडलिका नदी दुसऱ्या बाजूला हनुमान मंदिर सह्याद्री पर्वत रांगा या मधोमध असलेला रोहा शहराचा कशा पद्धतीने विकास करता येईल हे एक आवाहन निश्चित होते... पण खा. सुनिल तटकरेंच्या दूरदृष्टीमुळेच रोह्यातील विविध विकासकामे मार्गी लागली आहेत..असे प्रतिपादन आ. अनिकेत तटकरे यांनी केले...

बुधवार दि. १० जानेवारी रोजी रोहा नगर परिषद हद्दीतील महात्मा फुले नगर येथील विविध शौचालयाची दुरुस्तीसाठी ४० लाख, पठाण यांचे घरापासून ते डबीर यांच्या घरापर्यंतचा रस्ता विकसीत करणेसाठी ३५ लाख, आडवी बाजारपेठ रस्ता विकसीत करणेसाठी १५ लाख, विविध नगर परिषद शाळांची दुरुस्तीसाठी २५ लाख, अंधारआळी  येथील गटार बांधणेसाठी ७५ लाख, भुवनेश्वर येथील नगर परिषदेच्या मैदानावर विविध पायाभूत सुविधांची कामांसाठी १ कोटी जवळ जवळ ३.५० कोटी रुपयांचा निधी विकासकामांचा आ. अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले... 


आ. अनिकेत तटकरे पुढे म्हणाले की, २२ जानेवारी प्रभू श्रीरामाचा मंदिर प्राणप्रतिष्ठा हा ऐतिहासिक दिवस  आपल्या सर्वांसाठी, राष्ट्रवादीसाठी महत्वाचा आहे... रोह्यातील भव्यदिव्य मारुती मंदिरासाठी भरीव निधीची तरतूद खा. तटकरे, मंत्री आदिती तटकरेंनी उपलब्ध करुन दिला आहे... लवकरच मारुती मंदिराचा खा. तटकरेंच्या उपस्थितीत शुभारंभ होईल असे आ. अनिकेत तटकरे यांनी सांगितले. यावेळी महेंद्र गुजर, महेंद्र दिवेकर, महेश कोलटकर, समीर सकपाल, अहमद दर्जी,राजू जैन, प्रशासक तथा मुख्याधिकारी पंकज भुसे, वरसे सरपंच नरेश पाटील, उपसरपंच शांतीशील तांबे, अमित मोहिते, अमित उकडे, सुभाष राजे, रविंद्र चाळके, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, माझ सवाल, खेळाडू न.पा. कर्मचारी यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...

जुने व यंग स्टार नवोदित खेळाडूंना .सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन आमदार अनिकेत तटकरे .यांनी उदघाटन प्रसंगी गौरविले..व त्यांचा खेळातील उत्साह वाढविण्यासाठी नवीन खेळाडू घडतील असा आत्मविश्वास व्यक्त केला..रोहा अष्टमी नगर परिषदेचे वरचा मोहल्ला रस्ता कामाचे उदघाटन प्रसंगी आ. अनिकेत तटकरे, महमद डबीर, महेंद्र गुजर, महेंद्र दिवेकर, महेश कोलटकर, रियाज शेटे आदी तर दुसऱ्या छायाचित्रात भुवनेश्वर येथील नगर परिषदेच्या क्रिकेट मैदान भूमिपूजन कार्यक्रमात आ.अनिकेत तटकरे, महेंद्र गुजर, महेंद्र दिवेकर, महेश कोलटकर, समीर सकपाल, अहमद दर्जी,राजू जैन, प्रशासक तथा मुख्याधिकारी पंकज भुसे, वरसे सरपंच नरेश पाटील, उपसरपंच शांतीशील तांबे, अमित मोहिते, अमित उकडे, सुभाष राजे, रविंद्र चाळके, पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, जेष्ठ पत्रकार अरुण करंबे व अनेक पत्रकार, खेळाडू विविध क्षेत्रातील यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post