कुणबी दाखला न्यायासाठी संघर्ष पेटणार मोर्चा १४ डिसे
रोहा तालुक्यात कुणबी दाखला प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी तालुक्यातील कुणबी युवक संघटना तसेच ग्रामीण भागातील कुणबी ग्रूप शाखा व्यवस्थापक कुणबी दाखल्यासाठी तसेच आपल्यावर होत असलेल्या अन्यायावर मात करण्यासाठी पेटून उठला असून कुणबी दाखल्यांसाठी तसेच त्याच्या जात पडताळणीसाठी रोहा तालुक्यातील कुणबी समाज बांधवांची होत असलेली हेळसांड त्यावर लादलेल्या अटी शर्ती या अनुषंगाने तालुक्यातील कुणबी युवक संघटना तसेच ग्रामीण भागातील ग्रूप शाखा यांना पुन्हा आपल्या हक्कासाठी न्यायासाठी लढा उभारण्याची वेळ या समाज बांधवांवर आली असून आता पुन्हा प्रदीर्घ कालानंतर रोह्यात कुणबी समाज यांचा १४ डिसेंबर रोजी आयोजित केलेला मोर्चा. त्यामुळे रोहा तालुक्यात कुणबी समाज नेते माजी आमदार स्व.पा.रा.सानप यांच्या संघर्षाची पूनरावृत्ती दिसून येत असल्याने पुन्हा तालुक्यातील कुणबी समाज एकटवळा असून कुणबी दाखला प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी संघर्ष पेटणार असल्याचे या आंदोलनातून दिसून येईल का या कडेच बहुतांश लक्ष वेधले आहे.
ग्रामीण भागातील जनतेला तसेच दुर्लब समाज घटकाला त्यांच्यावर होत असलेल्या अन्याया विरोधाची चळवळ उभी करत त्या समाज घटकाला योग्य तो न्याय मिळालाच पाहिजे यासाठी आपले जीव की प्राण असा संघर्षाचा लढा उभारत शेतकरी वर्गाचा! बेदखल कुळांचा प्रश्न विधानसभेच्या पटलावर मांडणारा नेता, कुणबी समाजासाठी सदैव झटणारा नेता,म्हणजे कुणबी समाज नेते माजी आमदार स्व.पा.रा. सानप (दादा साहेब सानप ) आशा महान कर्तृत्ववान समाज नेते पर्वाचा अंत झाला आणि समाजात मोठी पोकली निर्माण झाली हे सत्य आजच्या पिढीला नाकारता येणार नाही. त्यामुळे आज दिवसेंदिवस शासन दरबारी होत असलेले काही बदल आणि त्यापासून समाजात शैक्षणिक, नोकर भरती, व्यवसायात आर्थिक विकासबाबत होत असलेली हानी अधिक समाजासाठी घातक ठरत असून यासाठी पुन्हा रोहा कुणबी समाजाला माजी आमदार स्व.पा.रा.सानप यांनी समाजासाठी केलेल्या संघर्षाची भूमिकेची जाणीव करून देत आहे. त्यामुळे प्रदिर्घ काळानंतर पुन्हा एकदा या समाजाला न्याय हक्कासाठी रोहा कुणबी समाज बांधव संघर्षाचा लढा देण्यासाठी पुन्हा संघटित होत असून गुरुवारी १४ डिसेंबर रोजी कुणबी दाखल्यांसाठी मोर्चाचा संघर्षमय लढा होत असल्याचे दिसून येत आहे.
कुणबी समाज नेते माजी आमदार स्व.पा.रा.सानप सन 1957 साली रोहा -सुधागड विधानसभा मतदार संघाचे दादासाहेब पहिले आमदार.झाले.दादा साहेबांना सुरुवाती पासूनच सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची आवड होती.त्यामुळे वडिलांचा वारसा पुढे कार्यरत ठेवत ते राजकारणात सक्रिय झाले.शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, मजुरांच्या जीवाभावाच्या विविध प्रश्नांवर काम करत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते अहोरात्र झटत होते. त्याचप्रमाणे कुटुंबाच्या उत्कर्षासाठी देखील अहोरात्र मेहनत करून आपले कुटूंब एका विशिष्ट.उंचीवर नेऊन ठेवले होते. परंतू समाजातील विविध.सामाजिक विषयावर समाज बांधवांच्या बैठका घेत त्यांना न्याय व हक्क मिळवून देत होते. आपल्या विखुरलेल्या कुणबी बांधवांना एकत्र करत समाजाची मोट बांधण्याचे काम त्यांनी त्याकाळात मोठ्या संख्येने केले होते.
तसेच या कुणबी समाजाच्या एकीच्या बळावरच दादासाहेबांनी सन १९५७ साली पहिली विधानसभा निवडणूक रोहा सुधागड या मतदारसंघात लढवत भरघोस मतांनी जिंकली आणि पुढे जनतेशी संपर्क ठेवत जोरदार कामाला सुरुवात केली.रोहा- मुरुड मतदार संघातून दुसऱ्यांदा आमदार होत त्यांनी शैक्षणिक व सहकार चळवळीत घेतली उंच भरारी त्या काळात ग्रामीण रोहा व रोहे शहर येथे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उच्च शिक्षण मिळावे म्हणून बोर्डिंगची स्थापना केली... त्यामुळे त्यांचा चांगला फायदा रोहे तालुक्यातील आसपासच्या गावातील ग्रामीण भागातील मुलांना झाला... तसेच रायगड जिल्हा मध्यवर्ती आणि भूविकास बँकेची स्थापना केली. ते सलग दुसऱ्यांदा रोहा- मुरुड या मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवत जिंकले आणि त्यापुढे देखील सामाजिक बांधिलकी अधिक जोपासत गावांचा व जनतेच्या कामाचा पाठपुरवठा तसाच चालू ठेवला. दादासाहेबांनी राजकारणात जे अतुलनीय कार्य केले त्याला आजतागायत तोड नाही. कारण एकही दिवस त्यांनी स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी राजकारण केलेले आठवत नाही तर माझा समाज जो आजही एक अनेक प्रथा परंपरा चालीरीती यामध्ये अडकला आहे. त्यातून तो बाहेर पडला पाहिजे तो एका विशिष्ट प्रवाहात आणून त्याला जगण्याच्या नव्या दिशा मिळाव्यात यासाठी ते सतत प्रयत्नशील व त्यासाठी कायम सघर्ष करत राहिले...संघर्षाचा महामेरू कुणबी समाजाचा महान पर्व हरपला मात्र तद्नंतर रोहा तालुक्यातील कुणबी समाज बदलत्या काळात विखुरला गेला का? हाच प्रश्न साऱ्यांना पडला आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गात असलेला कुणबी समाज आणि या घटकाला कुणबी दाखला मिळत नसल्याने त्याला ओबीसी आरक्षण शैक्षणीक, नोकर भरती, व्यवसायात अर्थिक दृष्टया लाभ मिळत नसल्याने कुणबी दाखल्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी शासनाने लावलेले १९६७ साल पूर्वीची जाचक अट तसेच त्यांची नोंद पुरावा अटीमुळे हे कुणबी जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने रोहा तालुक्यात पुन्हा कुणबी समाज संघटित होऊन न्यायासाठी संघर्ष करीत असताना दिसत आहे...
कुणबी समाजाला न्याय मिळावा म्हणून माजी आमदार स्व.पा.रा.सानप यांनी त्याकाळी विधी मंडळात अनेक प्रश्न मांडले माञ तदनंतर त्यांच्या प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा म्हणून श्यामराव पेजे आणि म्हसकर समिती अवाहल तसेच शेतकऱ्यांचा बेदखल कुलांचा प्रश्न देखील आजतागायत विधी मंडळातील शासनाच्या पटलावर असल्याने येथील दुर्लभ समाजाला न्याय मिळू शकला नाही. त्यामुळे रोहा तालुक्यातील कुणबी समाजाच्या वतिने पुन्हा मुलांचा शिक्षणासाठी लागणारा कुणबी दाखला अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न निर्माण झाला असून या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी गुरुवार दिनांक १४ डिसेंबर रोजी रोहा कुणबी समाजाचा संघर्ष पेटला आहे यासाठी मोर्चा काढला जाणार असुन संबधीत तहसील आणि प्रांत कार्यालयावर धडकत निवेदन देण्यात येणार आहे.त्याची दखल आजचे सरकार कितपत घेणार याचा आढावा तसेच त्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटतील का याकडे लक्ष वेधले आहेत .
