कोलाड (श्याम लोखंडे)
रोह्यात कुणबी समाजाचा एल्गार,
कुणबी राजा जागा हो, उठ समाजाचा धागा हो. कुणबी समाजही आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झाला असून आज गुरूवारी १४ डिसेंबर रोजी कुणबी दाखल्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक आंदोलन छेडण्यात आले आहे या प्रसंगी सदरच्या आंदोलनात तालुक्यातील हजारो कुणबी बांधव युवक, युवती, यांनी संघटित होऊन या मोर्चात सहभागी सहभागी होण्याचे आवाहन रोहा तालुका कुणबी समाज युवक अध्यक्ष अनंत थिटे यांनी केले आहे ..
आपण जन्माने आणि कर्माने कुणबी आहोत त्यामुळे एक दिवस आपल्या मुलांच्या तसेच भावी पिढीच्या उन्नतीसाठी कुणबी दाखल्या अभावी आपले होत असलेले शैक्षणीक, नोकर भरती, विविध व्यवसाय तसेच शेती व्यवसायात, अर्थिक दृष्टया नुकसान या साठी हे आंदोलन छेडण्यात आले असून यासाठी तालुक्यातील उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थि बांधव,युवक,युवती, महीला माता भगिनी, कुणबी बांधव यांनी यांनी आज १४ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता छेडण्यात आले असून या प्रसंगी भव्य मोर्चातून संबधीत रोहा तहसील कार्यालयावर तसेच प्रांत अधिकारी कार्यालयावर धडकणार असून या बाबतचे निवेदन देण्यात येणार आहे.यासाठी आपण सर्वांनी आंदोलनात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन थिटे यांनी समाजाच्या वतीने केले आहे...
जातीच्या दाखल्याच्या शिफारशीसाठी पात्रता १९६७ ऐवजी १९९० करावी, वंशावळीचे कार्यक्षेत्र जिल्हा स्तरावर गणले जावे, महसुली पुराव्याची अट रद्द करावी, मंडल आयोगानुसार २७ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे आदी मागण्या केल्या आहेत.तसेच या प्रमूख मागणी साठी तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी होत असलेल्या जाचक अटी शर्ती मुले शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे लाक्षणिक आंदोलन शांततेत आणि सरळ मार्गाने होत आहे यासाठी तालुक्यातील बहुसंख्ये कुणबी बांधव यांना आवाहन करण्यात येत असून महाराष्ट्र राज्य कुणबी समाज उच्चाधिकार समितीचे माजी अध्यक्ष शंकरराव म्हसकर, कुणबी समाजोन्नती संघाचे रोहा अध्यक्ष शिवराम शिंदे, कुणबी समाज नेते तथा रायगड जिल्हा ओबीसी सेल चे अध्यक्ष सुरेश मगर,यांच्या प्रमूख मार्गदर्शनाखाली या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन रोहा तालुका कुणबी युवक अध्यक्ष अनंत थिटे यांच्या वतीने करण्यात आले असून मोर्चा यशस्वी करण्यासाठी तालुका कुणबी युवक संघटना अथक परिश्रम घेत आहे असे थिटे यांनी सांगितले...
