महाराष्ट्र वेदभुमी

पिगोंडे ग्रामपंचायत मध्ये दिड महिन्यांपासून ग्रामसेवक नसल्याने नागरिकांची गैरसोय!

शहानवाज मुकादम/नागोठणा

पंचायत समिती रोहाकडून पर्यायी ग्रामसेवकाची व्यवस्था करण्यात आली आहे का? नसेल तर जबाबदार कोण ?

रोहा:तालुक्यातील पिगोंडे ग्रामपंचायत येथे दिड महिन्यांपासून कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्याने विकासकामे रखडली आसुन नागरिकांची ही गैरसोय होत आहे, त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये कायमस्वरूपी ग्रामसेवक देण्याची मागणी हाेत आहे...

ग्रामपंचायत पिगोंडे चे ग्रामसेवक विजय अहिरे यांचे प्रमोशन ने अलिबाग येथे बदली झाली असुन त्याना अलिबाग ला हजर होण्यासाठी पंचायत समिती रोहा कडून दिड महिन्यांपूर्वीच रोहा मधुन रिलीव्ह करण्यात आल्याची ची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून मिळत आहे...

 त्यानंतर  ग्रामपंचायत पिगोंडे येथे आजतागायत कोणत्याही ग्रामसेवकाची नेमणूक करण्यात आलेली नसुन ग्रामपंचायत कार्यालयाकडून नागरिकांची ही गैरसोय होत आसुन विकासकामांना ही खीळ बसली आहे...

 गत दिड महिन्यांपासून कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्याने ग्रामपंचायत कामकाजात अडचणी निर्माण झाल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.

 ग्रामपंचायतला पिगोंडे येथे दिड महिन्यांपासून कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्याने विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना विविध कागदपत्रांसाठी भटकंती करावी लागत आहे... पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना विविध दाखल्यांची गरज आहे, तसेच शैक्षणिक सत्रात विद्यार्थी व नागरिक विविध दाखल्यांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. याकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी ग्रामसेवक देण्याची गरज आहे...गटविकास अधिकारी रोहा यांच्या कडे संपर्क केले असता ते कधी व्यस्त  असतात तर कधी मिटींग मध्येच असल्याचे समजते...

तरी पंचायत समितीम रोहा यांनी दिड महिन्यांपासून पिगोंडे ग्रामपंचायतीवर ग्रामसेवक नसल्याने  पर्यायी व्यवस्था केली आहे का?

पिगोंडे ग्रामपंचायतीवर ग्रामसेवकाची  पर्यायी व्यस्था जर का आजतागायत केली नसल्यास याला जबाबदार कोण?

हा प्रश्न पिगोंडे ग्रामपंचायत चे स्थानिक नागरिकांकडून उपस्थित होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post