पुगांव - रोहा (नंदकुमार कळमकर)
कुंडलिका नदीचा डाव्या तिराच्या कालव्याचे पाणी वेळेवर,
कुंडलिका नदी पात्रातील डोळवहाल बंधाऱ्यातून माणगावच्या दिशेने जाणारा कुंडलिका डावा तीर कालव्याचे पाणी लवकरच लवकर म्हणजे १५ डिसेंबरच्या आत सोडण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली होती...परंतु कालव्याची दुरुस्तीची कामे करण्यासाठी दहा ते बारा दिवस उशीर झाला असला तरी पाटबंधारे खात्याच्या अथक प्रयत्नाने ही कामे २७ डिसेंबरपर्यंत म्हणजे वेळेवर पूर्ण करण्यात आली... या कालव्यामार्फत गुरुवार दि.२८ डिसेंबर रोजी कालव्याला पाणी सोडण्याचे अवघड काम कोलाड जलसिंचन विभागातील कार्यरत असणारे कर्मचारी व निवृत्त कर्मचारी यांच्या सहकार्याने तसेच जलसिंचन कोलाड विभागाचे कार्यकारी अभियंता पवार साहेब व उपअभियंता माणगावचे महामुनी साहेब यांनी तातडीने काम पूर्ण केल्यामुळे माणगाव पर्यंतच्या गावाची पाणीटंचाई दूर केलीच तर शेतीची कामे ही वेळेवर हंगामात पूर्ण होतील याबद्दल या परिसरातील शेतकरी वर्ग व ग्रामस्थ यांनी पाटबंधारे खात्याचे आभार मानले...
पावसाला संपल्यावर या परिसरात दोन महिन्यातच विहिरी तळ काढतात यामुळे तीव्र पाणी टंचाई निर्माण होते परंतु डोळवहाळ बंधाऱ्यातुन माणगावच्या दिशेने डाव्या तीर कालव्यातून अनेक वर्षांपासून पाणी सोडण्यात येते याचा फायदा शेतकरी वर्गाला होतो...व या पाण्यावर भात शेतीही उत्तम प्रकारे होते...याच बरोबर या परिसरातील पाणी टंचाई दुर होते यामुळे या परिसरातील कामे वेळेवर पुर्ण केल्याने पाटबंधारे खात्याचे चिंचवली तर्फे दिवाळी,तिसे,वरसगाव मधील शेतकरी व ग्रामस्थ मारुती रामा मालुसरे,धनंजय येरुणकर, शिरीष येरुणकर, राजेंद्र पिसाट,मानकर रावसाहेब,मनस्वी येरुणकर, राजेश कदम, सचिन भिलारे, बबन गंभीर,तिसे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच राकेश कांबळे, धनश्री खांडेकर, विजय बोरकर, यांनी पाटबंधारे खात्यात जाऊन पुष्प गुच्छ देऊन पाटबंधारे खात्याचे अधिकारी व सर्व कर्मचारी वर्ग यांचे आभार मानले...