माणगाव प्रतिनिधी सिकंदर आंबोणकर
बाळासाहेबांच्या भावना काय असतील असा प्रश्न पत्रकारांनी शिवसेना शिंदे गटाचे आ भरत गोगावले यांना विचारला असता वर जाऊन विचारावे लागेल असे उर्मट उत्तर देऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणाऱ्या गोगावले यांच्या फोटोला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी जोडे मारत आंदोलन केले.शिवसेनेचे दिवा शहर प्रमुख सचिन पाटील व दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी दिवा टर्निंग येथे आ भरत गोगावले यांच्या फोटोला काळे फासत जोडे मारो आंदोलन केले...भरत गोगावले यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करत लाखो शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता शिवसैनिक करत आहेत.एका टीव्ही चॅनलच्या पत्रकाराने गोगावले यांना बाळासाहेबांच्या भावना काय असतील असा प्रश्न विचारला असता वर जाऊन विचारावे लागेल किंवा तुमच्या सारख्या कुणाला तरी वर पाठवावे लागेल असे उर्मट उत्तर देऊन बाळासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप करत दिव्यातील शिवसैनिकांनी दिवा टर्निंग येथे गोगावले यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केले.शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल कोणताही आदर नाही केवळ मतांसाठी ते बाळासाहेबांचा फोटो वापरू इच्छित आहेत असा आरोप दिव्यातील शिवसैनिकांनी केला आहे...यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर प्रमुख सचिन पाटील, शहर संघटक रोहिदास मुंडे,अभिषेक ठाकूर युवा अधिकारी योगिता नाईक विधानसभा दिवाशहर संघटिका ज्योती पाटील शहर संघटिका तेजस पोरजी उपशहर प्रमुख वैष्णव पाटील उप शहर प्रमुख प्रियंका सावंत उपशहर संघटिका चेतन पाटील विभाग प्रमुख मच्छिंद्रनाथ लाड विभाग प्रमुख अक्षय म्हात्रे उपशहर अधिकारी स्मिता जाधव विभाग संघटिका मयुरी पोरजी विभाग संघटिका गुरुनाथ पाटील उपविभाग प्रमुख विनय कदम उपविभाग संघटिका,अजित माने,निलेश चाळके,राज कदम,संजय जाधव, नागेश पवार,गणेश सावंत,अमित गुप्ता, लवकुश अग्रहारी,प्रतीक म्हात्रे,ओकेश म्हात्रे,रोहित भाईजे,चेतन पाटील, अनिरुद्ध तिवारी,अनिल पवार,विकास उत्तेकर,अमितराज गुप्ता,संजय कनोजिया प्रशांत आंबोणकर आदी शाखाप्रमुख,उपशाखाप्रमुख,गटप्रमुखअन्य युवासेना शिवसेनेचे महिला पुरुष मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते...
