पुगाव-खांब (नंदकुमार कळमकर)
रोहा तालुक्यातील तसेच खांब विभागातील इंग्रजी शिक्षण माध्यमात अग्रेसर असलेल्या मंजुळा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे ज्ञानांकुर इंग्लिश मिडियम स्कूल खांब येथे वार्षिक क्रिडा स्पर्धा सन २०२३/२४ च्या या शाळेच्या वतीने मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आल्या.
सदर या वार्षिक क्रिडा स्पर्धेचे शुभारंभ कोलाड लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन नरेश बिरगावले यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष लायन डॉ सागर सानप,लायन प्रो. माधव आगरी, उपाध्यक्ष लायन डॉ मंगेश सानप, केंद्र प्रमूख रत्नाकर कनोजे सर, देवकान्हे ग्राम पंचायतीचे उपसरपंच सुरज कचरे,लायन अलंकार खांडेकर,लायन नंदकुमार कळमकर, सामाजिक व शिक्षण प्रेमी भगवान तूपकर, सचिन गोळे,रविंद्र कन्हेकर, शाळेचे संस्थापक /अध्यक्ष रविंद्र लोखंडे,मुख्याध्यापिका -रिया लोखंडे.शिक्षिका ऋतुजा पवार,प्रतिक्षा धामणसे,शुभदा भालेकर,प्रज्ञा माने,स्नेहा मोहिते, निलम दळवी, नवनिता देवकर,आदी क्रिडा स्पर्धेचे विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थीत होते.
खांब देवकान्हे तसेच ग्रामीण भागात तर या परीसरात इंग्रजी शिक्षणात अग्रेसर असलेल्या या ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल च्या विद्यार्थ्यांनी शिक्षणा बरोबर क्रिडा स्पर्धेत देखिल तालुका, जिल्हा,आणि राज्य पातळीवर नाव लौकिक केले आहे तर शाळेत संपन्न झालेल्या क्रिडा स्पर्धेत विविध खेळ खेळले गेले यात कबड्डी,रस्सीखेच,डॉजबॉल
100 मिटर व 200 मिटर धावणे,थाळी फेक, गोळा फेक,उंच उडी, लांब उडी,त्याच बरोबर फनी गेम्स -चमचा गोटी, बुक बॅलन्स, पोटॅटो रेस, चित्र कलेतून हत्तीला शेपूट लावणे,आणि मडका फोडी अशा विविध खेळांच्या वार्षिक क्रिडा स्पर्धा या शाळेत मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आल्या.
तर सालाहबाद प्रमाणे यंदाही या स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी वैयक्तिक खेळ तसेच सामूहिक उत्तमरित्या खेळ करत या स्पर्धेतील विविध खेळांचा आनंद लुटला.

