कोलाड (श्याम लोखंडे)
सातत्याने खराबच रेशन मिळत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप, खराब धान्य असल्यास बदलून देण्यात येईल असा पुरवठा विभागाने ग्रामस्थांना आश्वासन दिले आहे...रोहा तालुक्यातील गोफण या गावात मंगळवारी दिनांक१९/१२/२०२३ रोजी रेशनिंग दुकानात निकृष्ट दर्जाचे तांदुळ नागरीकांना देण्यात आले... तांदुळ निकृष्ट दर्जाचे होतेच परंतु तांदळात उंदराची लेंडी, कबुतरांची शीट यासह अन्य कचरा आढळून आले.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे... या संबधीत सामाजिक कार्यकर्ते शशीकांत कडू यांनी पुरवठा विभाग व तहसीलदारांना निर्देशनास आणुन दिले...हा तांदुळ खराब असल्याचे तांदळाची पिशवी दाखविण्यात आली...यामुळे रोहा तालुक्यात पुन्हा एकदा रेशनिंग धान्याच्या दर्जा बाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे...
शासनाकडूनच निकृष्ट दर्जाचे रेशन येत असल्याचे या प्रकरणावरुन दिसून आले...गोडावुन मधुनच तांदुळ खराब आले आहे...एकीकडे शासन जनतेला मोफत धान्य वाटप करत असताना हे या धान्यात उंदराची लेंडी, कबुतरांची शीट व घाण असल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे...
या संबधीत तहसीलदार किशोर देशमुख व पुरवठा अधिकारी उज्वला अंधारे यांना शशीकांत कडु यांनी हे धान्य निर्देशनास आणुन दिल्या नंतर यांची चौकशी करण्याचे आश्वासन तहसीलदार किशोर देशमुख यांनी यावेळी दिले...ग्रामस्थांना खराब असलेले तांदुळ बदलुन देणार असल्याचे पुरवठा अधिकारी उज्वला अंधारे यांनी सांगितले...दुकानदार रघुनाथ कडु यांनी सुध्दा तांदुळ खराब असल्यास बदलुन देणार असल्याचे सांगितले...
प्रतिक्रया
उज्वला अंधारे : पुरवठा अधिकारी रोहा
आम्ही वारंवार दुकानदारांना सुचना देत आहोत खराब धान्य असल्यास वाटू नका धान्य बदलून देण्यात येईल... गोफण येथे रेशन दुकानदारांने निकृष्ट दर्जाचा तांदूळ वाटले असल्यास बदलुन देण्यात येईल...
प्रतिक्रया
किशोर देशमुख तहसीलदार : रोहा
कोणत्याही दुकानात खराब धान्य वाटप होत असल्यास आम्हाला निर्देशनास आणुन द्या गोफण येथील या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दुकानदारांना नोटीस काढण्यात येईल असे सांगितले...
प्रतिक्रया.
रघुनाथ कडू : दुकानदार गोफण
गोडावुनमधुनच तांदुळ खराबच मिळत आहे...आमची कोणतीही चूक नाही...खराब धान्य बदलून देण्यात येईल...
प्रतिक्रया
शशीकांत कडू : ग्रामस्थ गोफण
मंगळवारी रेशनिंग दुकानातुन तांदुळ निकृष्ट दर्जाचे आले असून या तांदळात उंदराची लेंडी, कबुतरांची शीट व कचरा होता...या निकृष्ट व घाण असलेले तांदुळ मी पुरवठा अधिकारी व तहसीलदारांना निर्देशनास आणुन दिले आहे...
