अलिबाग : विशेष प्रतिनिधी
अतिक्रमण करून अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर नक्की वरदहस्त कोणाचे असा सवाल रेवदंड्यातील जनता विचारत आहे. इतिहासकालीन रेवदंड्यातील मोठे बंदर येथे सरकार नियमांचे उलंघन करून सरकारच्या जागेत अनाधिकृत बांधकामे पुन्हा करण्यात आली आहे. कोट्यावदी रुपयांच्या सरकारी जमिनीवर बेकायदा पद्धतीने तंबू ठोकून पर्यटन व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. याबाबत ग्रामस्थांनी पुन्हा रेवदंडा ग्रामपंचायत, रेवदंडा पोलीस, जिल्हाधिकारी रायगड, अलिबाग प्रांताधिकारी, अलिबाग तहसिलदार व पोलिस अधिक्षक रायगड यांच्याकडे तक्रार अर्ज केला असून शासकीय कामात अडथळा आणला म्हणून कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा व पुन्हा केलेले अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
रेवदंडा मोठे बंदरातील जागेवर भूमाफियांनी ताबा मिळवत, बेकायदा व्यवसाय राजरोसपणे सुरू केला असुन बंदर येथील पुनस्यः बेकायदेशीर रित्या बांधण्यात आलेले कुंपण हटविण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. या अनधिकृत बांधकामांना नक्की वरदहस्त कोणाचे असा सवाल अनेकांना पडला आहे. सरकारी अधिकारी देखील दुर्लक्ष करीत असून बंदरे आणि बंदरांच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि प्रशासन नियंत्रण आण्यासाठी नियुक्त केलेले महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड (MMB) मंडळाकडे जबाबदारी सोपवली असताना रेवदंडा मोठे बंदर येथे सरास डिझेल तस्करी, अनधिकृत धंदे होत असून (MMB) अधिकारी मात्र याकडे कानाडोळा करत आहेत...
ग्रामस्थांनी वारंवार तक्रार, निवेदन देवूनही सरकारी अधिकऱ्यांकडून अद्यापी कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने मोठे बंदर येथील ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून अतिक्रमण हटविण्यात यावे या मागणीस जोर धरला आहे. अतिक्रमण हटविण्यास न आल्यास यापुढे उपोषणास बसण्याचा तसेच वेगळया मार्गाने आंदोलन छेडण्याचे मनोगत मोठे बंदर ग्रामस्थ सुरेखा हाडकर हिने व्यक्त केले आहे. ग्रामस्थ सुरेखा हाडकर हिने याबाबत रेवदंडा ग्रामपंचायत, रेवदंडा पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी रायगड, अलिबाग प्रांताधिकारी, अलिबाग तहसिलदार, पोलिस अधिक्षक रायगड यांना निवेदन दिले आहे...
