महाराष्ट्र वेदभुमी

आवरे शाळेत बाल मेळावा उत्साहात साजरा

 


उरण दि १५(विठ्ठल ममताबादे )

रायगड जिल्हा परिषद शाळा आवरे आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा पूर्व तयारी बाल मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे यूएसएचे डेनी सर त्याचबरोबर बाल शिक्षण विभाग मुंबई आणि शाळा पूर्वतयारीचे राज्य कॉर्डिनेटर स्मितीन ब्रीद  तसेच प्रथम युएसएच्या प्रमुख मल्लिका , एफसीएम हेड प्रथम संस्था हेमलता ससाने  प्रथम प्रोग्राम हेड भोजराज क्षीरसागर, ग्रुप ग्रामपंचायत सरपंच श्रीमती निराताई पाटील व गावातील निपुण गट महिला पालक शाळेतील सर्व शिक्षक प्रथमचे सर्व शिक्षक प्रतिनिधी व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी बोलताना डेनी यांनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांची प्रगती पाहून विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली महाराष्ट्रामध्ये शिक्षण विभागात जिल्हा परिषद मध्ये शाळांवर चांगले शिक्षण दिले जाते आणि याचा मूळ माता पालक असल्याचे त्यांनी बोलून दाखवले त्याचबरोबर नितीन ब्रिद या कार्यक्रमाचे कॉर्डिनेटर यांनी आवरे शाळेमध्ये येऊन आनंद झाल्याचे बोलून दाखवले कारण शाळा पूर्व तयारी या कार्यक्रमासाठी माता पालकांची उपस्थिती पाहून मी भारावून गेलो असे ते म्हणाले याचबरोबर आवरे शाळेमध्ये असलेल्या भौतिक सुविधांसाठी प्रथम संस्था अग्रेसिव राहील असे त्यांनी बोलून दाखवले मल्लिका  हेमलता ससाणे यांनी सुद्धा शाळेबद्दल चांगले उदगार काढले प्रथम प्रोग्राम हेड भोजराज क्षीरसागर यांनी शाळेच्या सुविधांसाठी आम्ही प्रयत्न करू असे सांगितले यावेळी गावातील माता पालक शाळेतील शिक्षक गणेश गावंड, श्रीमती अरुणा तिरमाळी, सौ.कोल्हे मॅडम, श्री. आहेर  उपस्थित होत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  निर्भय म्हात्रे यांनी केले सर्व पाहुण्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक  बबन पाटील सरांनी केले विद्यार्थी व पालक उपस्थितीत बाल मेळावा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post