महाराष्ट्र वेदभुमी

रायगड जिल्ह्यातील शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर



माणगाव प्रतिनिधी सिकंदर आंबोणकर

जुनी पेन्शन योजना व इतर १७ प्रलंबित मागण्यासाठी मार्च २०२३ मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता; त्या संपामध्ये मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी भूमिका घेऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.सहा महिने उलटून गेले तरी त्या संदर्भात कोणताही तोडगा किंवा कामगारांना न्याय मिळाला नाही.

त्या अनुषंगाने आज दिनांक १४ डिसेंबर २०१३ रोजी पुन्हा एकदा शासकीय कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत...दि. १४ डिसेंबर २०२३ रोजी संपकरी कर्मचारी शिक्षक यांचा मोर्चा अलिबाग येथील मारुती नाका येथून सुरू झाला हा मोर्चा धर्मदाय आयुक्त कार्यालय,बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांनाय अभिवादन करून बालाजी नाका, मारुती नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत आयोजित करण्यात आला हिरेकोट तलावाजवळ झालेल्या जाहीर सभेला संबोधित केले संघटनेच्या वतीने समन्वय समिती अध्यक्ष सुरेश पालकर,कार्याध्यक्ष डॉ. कैलास चौलकर,मध्यवर्ती संघटना अध्यक्ष संदीप नागे,निमंत्रक प्रभाकर नाईक,प्रकाश पाटील,राजेंद्र गायकवाड,प्रफुल्ल पाटील, परशुराम म्हात्रे,दर्शना पाटील,रत्नाकर देसाई, प्रफुल्ल कानिटकर,दर्शना कांबळे,निला देसाई,उमेश करंबत,राजेश सुर्वे,सोपान चांदे,विजय येलवे,राजू रणवीर,विकास पवार,गोविंद म्हात्रे,अनंत बनसाड,सचिन जाधव,नितेश तुरे इतर पदाधिकारी व मोठ्या संख्येने कर्मचारी शिक्षक उपस्थित होते.तद्नंतर प्रमुख मागण्यांचे निवेदन सर्व सरकारी कर्मचारी यांना नवीन अंशदायी निवृत्ती वेतन योजना DCPS, योजना)राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना NPS रद्द करून नोव्हेंबर २००५ नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना OPS लागू करा.PFRDA कायदा रद्द करावा,खाजगीकरण, कंट्राटीकरणाचे धोरण रद्द करा,कंत्राटी कामगारांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे,शासनाच्या सर्व विभागातील रिक्त पदे तात्काळ भरावी,अनुकंपा तत्वावरील नियुक्ती तात्काळ करण्यात यावी,नवीन शैक्षणिक धोरण रद्द करावे,शिक्षणाचे छुपे खाजगीकरण रद्द करावे, भारतीय दंड संहिता कलम ३५३ पुर्वी प्रमाणे प्रभावी करा व इतर प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अलिबाग यांच्या मार्फत मुख्यमंत्री  महोदयांना देण्यात आले...

दि.१४ डिसेंबर २०२३ पासून झालेल्या संपामधे राज्य सरकारी, निमशासकीय,जिल्हा परिषद कर्मचारी,शिक्षक व शिक्षकेतर, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद,नगरपंचायत,ग्रामपंचायत कर्मचारी व शिक्षकांचा संपात सहभाग असल्याचे सांगण्यात आले‌.

Post a Comment

Previous Post Next Post