उरण तालूक्यातील करळ येथील रहिवाशी तथा महिला सामाजिक कार्यकर्त्या निर्मला वसंत तांडेल (वय ५५ वर्षे) यांचे दिनांक २४/१२/२०२३ रोजी दुःखद निधन झाले आहे.सामाजिक कार्यकर्ते वसंत हसुराम तांडेल यांच्या त्या पत्नी होत्या. निर्मला तांडेल या करळ ग्रामपंचायत मध्ये २ वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेल्या आहेत. ग्रामपंचायत सदस्य पदावर असताना त्यांनी गोर गरिबांची अनेक कामे निस्वार्थी वृत्तीने केली आहेत.अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत.पती,२ मुले असा त्यांचा कुटुंब परिवार आहे. निर्मला तांडेल यांचा दशक्रिया विधी मंगळवार २/१/२०२४ रोजी श्री क्षेत्र नाशिक येथे तर उत्तर कार्य विधी शुक्रवार दि ५/१/२०२४ रोजी त्यांच्या राहत्या घरी करळ येथे होणार आहे. या दुःखद प्रसंगी कोणत्याही प्रकारचे दुखवटे स्वीकारले जाणार नसल्याचे तांडेल परिवारामार्फत कळविण्यात आले आहे. निर्मला तांडेल यांच्या निधनाने करळ ग्रामस्थ व तांडेल परिवारात शोककळा पसरली आहे.मनमिळावू, प्रेमळ असल्यामुळे त्यांच्या निधनामुळे मोठया प्रमाणात नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.