महाराष्ट्र वेदभुमी

"काळभैरव चषक २०२३" श्री काळभैरव क्रिकेट मंडळाची क्रिकेट स्पर्धा संपन्न


माणगाव प्रतिनिधी सिकंदर आंबोणकर

सानपाडा,नवी मुंबई येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेत तळा तालुक्यातील २४ संघानी घेतला भाग

श्री काळभैरव क्रिकेट मंडळ (चोरवली ता. तळा जि.रायगड) यांनी तळा तालुका मर्या.ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा दि.०३/१२/२०२३ रोजी सानपाडा,नवी मुंबई येथे आयोजित केल्या होत्या; सदर स्पर्धेत तळा तालुक्यातील २४ संघानी भाग घेतला होता...खेळी मेळीच्या वातावरणात स्पर्धा पार पडल्या.

स्पर्धेसाठी चोरवली गावचे अध्यक्ष जयवंत कातुर्डे,उपाध्यक्ष किशोर ढऊल,सचिव नामदेव अंबावले,उपसरपंच गणेश राणे,खजिनदार सचिन अंबावले,राजु अंबावले तसेच ग्रामस्थ मंडळ चोरवली,मुंबई मंडळ,युवा तरुण मंडळ यांनी स्पर्धा पार पडण्यासाठी चोख भूमिका बजावल्या...

सदर स्पर्धेमध्ये धावीर क्रिकेट संघ(ताम्हाणे) यांनी प्रथम क्रमांक पटकावला,द्वितीय क्रमांक तळेगाव क्रिकेट संघ संघाने तर तृतीय क्रमांक श्री काळभैरव क्रिकेट संघ चोरवली यांनी पटकावले...

स्पर्धेसाठी शिवसेना (उ.बा.ठाकरे)पक्षाचे नवी मुंबई उपशहर प्रमुख संदीप पवार,युवासेना तळा ता. समन्वयक रुपेश मिरगळ,युवासेना उप ता.अधिकारी निलेश खरपुडे,युवासेना तळा ता.सोशल मीडिया समन्वयक देव दुर्गवले, ज्येष्ठ शिवसैनिक प्रदीप चोरगे,आप्पाजी चोपदार या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थिती स्पर्धा पार पडल्या...

Post a Comment

Previous Post Next Post