रोहा दि. ४ डिसें.प्रतिनिधी :-
राष्ट्रीय नौदल प्रशिक्षण केले पूर्ण, भारतीय नौदलात होणार रुजू
रोह्यातील सामाजिक कार्यकर्ते अशोक तेंडुलकर यांचा मुलगा कु. यश अशोक तेंडुलकर याने नुकताच राष्ट्रीय प्रभोधिनी नौदल एन.डी.ए. चे ३ वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केले असून एक वर्षाचे नेव्ही कोचीन प्रशिक्षण केरळ येथे पूर्ण झाल्यानंतर यश देशाच्या सेवेत रुजू होणार आहे...यश तेंडुलकरच्या या गौरवशाली कामगिरी आणि उतुंग भरारी घेतल्याबद्दल तमाम रोहेकरांची मान अभिमानाने उंचावली आहे... त्याचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंद होतं आहे...
कु. यश अशोक तेंडूलकर याने जे. एम.राठी स्कूल मध्ये दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केले... १० वी मध्ये ९१ टक्के गुण प्राप्त केले होते, अवघड असणाऱ्या गणित विषयामध्ये ९८ गुण मिळवून शाळेत पहिला येण्याचा बहुमान त्याने प्राप्त केला... यश आठवी पासूनच आर्म फोर्स मधे जाण्याच स्वप्न उराशी बाळगून धेय्य प्राप्ती कडे आगेकूच करत होता... दहावी झाल्यावर संभाजीनगरला एस.पी.आय मध्ये बारा हजार मुलांमधून ६० जणांची निवड होणार होती... तिथे अशक्य वाटणार आव्हान पार करून ६० मुलांमध्ये मध्ये येण्याचे यश त्याने खेचून आणले... त्यानंतर खडकवासला पुणे येथिल एनडीए परीक्षा उत्तीर्ण होत आपले पुढील शिक्षण सुरु ठेवले... नुकतेच त्याने एनडीएचे खडतर प्रशिक्षण पुर्ण केले... येणाऱ्या ३० डिसेंबर रोजी देशाच्या राष्ट्रपती द्रौपती मुर्मु यांच्या उपस्थितीत एनडीएची पासिंग प्रेड यश पूर्ण करत आहे...
यश तेंडुलकर हा नेहमीचं पोहण्यात अव्वल होता... त्याने बऱ्याच वेळा गोल्ड सिल्वर ब्राँझ पदक मिळवली आहेत. आणि त्याला इंडीयन नेव्ही मधे जाण्याची इच्छा होती... आज त्याचं हे स्वप्न पुर्ण होत आहे... तीन वर्षाचं खडतर ट्रेनिंग पुर्ण झाले आहेत...आणि आता एक वर्षाचं नेव्ही कोचीन केरळ येथे ट्रेनिंग पुर्ण करण्या साठी जाईल त्यानंतर यश देशाच्या सेवेत रुजू होणार आहे... यश तेंडुलकर हा नौदलात देश सेवेसाठी रुजू होणार असल्याचे समजताच शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी यश आणि त्याच्या आईवडीलांचे सन्मान केलें, त्याचबरोबर श्री धावीर देवस्थान ट्रस्ट श्री धावीर मंदिरात, तर रोहा प्रेस क्लबने आपल्या शिबिरामध्ये यशचे सन्मान केले, यावेळी त्याचे वडील अशोक तेंडुलकर, मातोश्री सौ. ज्योती अशोक तेंडुलकर आदी उपस्थित होते...
