कोलाड लायन्स क्लब गेली तीन वर्ष कोलाड विभाग आणि परिसरात विविध उपक्रम राबवत आहे त्यामुळे सामजिक बांधिलकीचे जतन करत लायन्स क्लबच्या माध्यमातून वारकरी पायी वारी दिंडीतील संप्रदाय मंडळी यांच्यात मधुमेह रक्तदाब आजारावर उत्तमरीत्या जनजागृती करत शंभरहून अधिकांची मोफत तपासणी यावेळी करण्यात आली...
लायन्स क्लब कोलाड आणि डॉ विनोद गांधी नर्सिंग होम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या श्री संत ज्ञानेश्वर सत्संग वारकरी संप्रदाय पायी दिंडी संभे ते आळंदी पायी दिंडीचे प्रस्थान प्रसंगी दरम्यान मौंजे सुतारवाडी येथील दत्त मंदिर सभागृहात उपस्थीत सर्व वारकरी संप्रदाय भाविक भक्तगण यांची मोफत मधुमेह रक्तदाब तपासणी तसेच त्यांना मार्गदर्शन करण्यात आले...
कोकण वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान स्वा. सु. नि. सद्गुरू गुरूवर्य अलिबागकर महाराज, गुरूवर्य गोपाळ बाबा वाजे यांच्या कृाशीर्वादाने चालत आलेली पायी दिंडी परंपरा रायगड भूषण ह.भ.प. नारायण महाराज दहिंबेकर यांच्या नेतृत्वाखाली या पायी दिंडीचे आयोजन रोहा संभे ते आळंदी करण्यात येते या अनुषंगाने कोलाड लायन्स क्लबच्या वतीने पायी चालत आलेली संत मंडळीचे मधुमेह रक्तदाब तपासणी करून त्यांना मोलाचे मार्गदर्शन करत उपचार केले तर आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात दिंडीचे मूळ मार्गदर्शक ह.भ.प नारायण महाराज (आण्णा) दिहिंबेकर यांच्यासह दिंडीतील वारकरी संप्रदाय यांनी याचा लाभ घेत तपासणी केली...
सदरच्या आयोजित केलेल्या शिबिरात एकूण ११९ जणांची मधुमेह रक्तदाब तपासणी करण्यात आली...यावेळी लायन्स क्लबचे उपाध्यक्ष डॉ विनोद गांधी, डॉ श्याम भाऊ लोखंडे,खजिनदार नंदकुमार कळमकर,बोर्ड ऑफ डायरेक्टर रविंद्र लोखंडे, दिनकर सानप,विठ्ठल सावळे, राजेंदर कोप्पु, विश्र्वास निकम,लायन सौ पुजा लोखंडे, सपना गांधी, नर्स देविका, कल्याणी, आदी लायन मेंबर उपस्थित होते...
