महाराष्ट्र वेदभुमी

श्रीगाव येथील बुद्ध विहारात पाली भाषेचे मार्गदर्शन




(सचिन पाटील) अलिबाग

बौध्दजन पंचायत समिती अलिबाग मधील गटशाखा क्र.१ श्रीगांव श्रीरत्न बुद्ध विहारात दि. १०/१२/२०२३रोजी पाली भाषा पहिल्या परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अलिबाग तालुका संस्कार कमिटीचे अध्यक्ष व बौद्धाचार्य आयु. परशुरामजी ओव्हाळ यांच्या उपस्थितीत पाली भाषेचे अभ्यासक आयु धरमदास डवळे सर यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाची प्रस्तावना आयु. विजयजी गायकवाड यांनी केली.तसेच श्रीगाव शाखेचे अध्यक्ष-आयु-केशव ओव्हाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले...या पाली भाषा मार्गदर्शन कार्यक्रमास असंख्य विद्यार्थी व रमाई महिला मंडळ, अध्यक्षा - मोहिनी मोहन ओव्हाळ, तसेच शाखेच्या उपाध्यक्षा सविता नामदेव ओव्हाळ,उपासिका चंद्राबाई ओव्हाळे, शुभांगी ओवाळ, व उपासक ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच पाली भाषेचे मार्गदर्शक - आयु. डवले सर यांचा पुष्पगुच्छ देऊन आयु.परशुरामजी ओव्हाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच आजचे कार्यक्रम हे बौध्दाचार्य परशुराम ओव्हाळ यांच्या विशेष प्रयत्नांनी घेण्यात आले...

Post a Comment

Previous Post Next Post