महाराष्ट्र वेदभुमी

ज्येष्ठांचा वाढदिवस आणि सत्कार समारंभ उत्साहात साजरा

 



 उरण दि.३१( विठ्ठल ममताबादे)

ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था करंजा या सामाजिक संस्थेत‌र्फे नवनविन उपक्रम राबविले जातात. ज्येष्ठांच्या  सुखदुःखात सहभागी होत संस्थेतर्फे प्रत्येक सदस्यांचा, जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा केला जातो.या संस्थेच्या वतीने जेष्ठ नागरिक प्रशांत थळी, मेघनाथ कोळी यांचा वाढदिवस आणि सत्कार समारंभ करंजा उरण येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उरण पंचायत समितीचे माजी सभापती सागर कडू यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रशांत थळी,मेघनाथ कोळी यांनी वाढदिवसानिमित्त केक कापला व आपला आनंद द्विगुणित करत सर्वांना केक भरविला. संस्थेचे संस्थापक आणि कार्याध्यक्ष राजेंद्र घरत आपल्या भाषणात म्हणाले की ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था आम्ही ज्येष्ठांच्या विरंगुळा , करमणूक आणि ज्येष्ठाना आनंद मिळविण्यासाठी तसेच मनमोकळे करण्यासाठी संस्था स्थापन केली आहे. आणि ज्या काही सरकारी योजना आहेत त्या मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून लाभलेले पंचायत समितीचे माजी सभापती सागर कडू यांनी जेष्ठ नागरिक सामाजिक संस्था ही एक सामाजिक संस्था असून संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे. संस्थेच्या माध्यमातून अनेक समजपयोगी उपक्रम राबविले जात आहेत.तुमच्या संस्थेला कोणतेही मदत, सहकार्य लागत असेल तर मी जबाबदारीने पार पाडेन, आपल्या संस्थेला माझे योग्य ते सहकार्य असेल असे वचन सागर कडू यांनी आपल्या भाषणातून जेष्ठ नागरिकांना दिले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गजानन थळी,उपाध्यक्ष रामकृष्ण हिराजी म्हात्रे, खजिनदार विजय बाळाराम गाडे,सहखजिनदार - धनाजी बाळकृष्ण सोनकर,सचिव- अशोक नथुराम थळी यांची भाषणे झाली. यावेळी संस्थचे इतर सदस्य, जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post