महाराष्ट्र वेदभुमी

२६ नोव्हेंबर रोहा तालुका कुणबी युवक मंडळाची सभा,


कोलाड (श्याम लोखंडे) 

अधिकाधिक युवकांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन :- अनंत थिटे 

राज्यात सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे न्याय मिळावा म्हणून आंदोलनातून जागो जागी पेटून उठला आहे. तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता शासनाने त्यांना आरक्षण द्यावें यावर ओबीसी समाज तथा नेतेगन ठाम राहिले आहेत. त्यामुळे ओबीसीला धक्का न लावता मराठयांना आरक्षण देण्यास कोणतीही हरकत नाही तसेच राज्य सरकारने जाहीर केलेल्या मराठा कुणबी, कुणबी मराठा, ह्या नोंदींचा डेटा गोळा केला जात आहे परंतु या डेटा पासून कोकणातील रायगड जिल्ह्यातील उत्तर रायगड कुणबी नोंदी पासून वंचित राहिला आहे त्यामुळे आता येथील कुणबी समाज ही आक्रमत्तेच्या तयारीत असल्याचे रोहा तालुक्यात दिसत असून या अनुषंगाने तालुका स्तरावर कुणबी युवक मंडळाची सभा रविवारी २६ नोव्हेंबर रोजी तालुका अध्यक्ष अनंत थिटे यांच्या अध्यक्षतेखाली रोहा कुणबी भवन येथे आयोजित करण्यात आली असून अधिक अधिक कुणबी युवकांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन अध्यक्ष थिटे यांनी  केले आहे....

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीण शाखा तालुका रोहा युवक मंडळाची सभा रविवारी २६ नोव्हेंबर रोजी माजी आमदार स्व. पा. रा. सानप कुणबी भवन रोहा येथे सकाळी ठिक १०  वाजता आयोजित करण्यात आली असून यासाठी तालुक्यातील सर्व कुणबी युवक बांधवानी या सभेस उपस्थित राहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष अनंत थिटे यांनी केले आहे. तसेच सर्वांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या जातीच्या दाखल्यासंदर्भात सविस्तर चर्चा सर्व युवकांचा साक्षीने करण्यांत  येणार आहे आपण जन्माने कर्माने कुणबी आहोत आपणांस OBC मध्ये आरक्षण आहे पण हे आरक्षण केवल शासनाच्या कागदोपत्री राहिले त्या आरक्षणाचा आपल्या काही उपयोग नाही त्यासाठी अजूनही वेळ गेली नाही आपण एकत्र येऊन आपला विषय मार्गी लावू शकतो आज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची चर्चा न करता आपल्या समाजासाठी एकत्रित येऊन लढा देण्याची गरज आहे. संघर्ष करण्यासाठी एकत्र यायला हवे असा निर्धार केला तर आपण कुणबी आहोत आणि आपल्याला जे OBC  मध्ये जे आरक्षण मिळाले आहे ते विना अट व त्यावरील लावलेले निकश हे सरकारने हटवले तरच आपल्याला योग्य न्याय मिळू शकेल व मिळाले पाहिजे या विचाराने सारे एकत्रित येऊन लढा देण्याची गरज भासत असल्याने या सभेचे आयोजन केले असल्याची माहिती थिटे यांनी सांगितले आहे..

रायगड जिल्ह्यात कुणबी समाज नेत्यांच्या पावलावर पाऊल टाकत समाजासाठी काम करणारे कुणबी समाज नेते तसेच रायगड जिल्हा ओबीसी समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश मगर यांच्या नेतृत्वाखाली आपला लढा सुरु केला आहे. परंतु रायगडमधील उत्तर रायगडात रोहा, सुधागड, पेन, अलिबाग, मुरुड,खालापूर,कर्जत या भागात १९६७ च्या मराठा कुणबी मराठा नोंदी नसल्यानें आपण शैक्षणिक, सामाजिक, अर्थिक दृष्टया मागास राहीलो आहोत त्यामुळे राज्य सरकारने आपण जन्माने आणि कर्माने कुणबी आहोत त्यामुळे १९६७ सालाची जात प्रमापत्रासाठी असलेली जाचक अटी शर्ती ह्या रद्द करण्यात याव्या या मागणीसाठी एकत्रित सभेचे आयोजन करण्यात आले असून यासाठी तालु्यातील सर्व कुणबी युवकांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन अध्यक्ष थिटे यांनी केले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post