महाराष्ट्र वेदभुमी

रोहा तालुक्यातील कुणबी पेटला, विभागात बैठकांवर बैठका सुरू, दाखल्यासाठी एकत्रित



कोलाड (श्याम लोखंडे)

खांब विभागीय कुणबी समाजाचा निर्धार.

राज्यातील मराठ्यांना सरसकट आरक्षण, ओबीसीत समावेश, स्वतंत्र आरक्षण, आर्थिक निकषांवर आरक्षण अशा विविध मुद्यांत राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे...त्यात ओबीसी, मराठा समाजात अंशतः दरी निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे... आंदोलन प्रतिआंदोलने सर्वत्र सुरू आहेत... या सर्व आरक्षण मुद्यांत मराठा आरक्षणाचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या निकराच्या लढ्याने चांगलेच यश गाठले त्यामुळे राज्यात आतापर्यंत २९ लाख कुणबी नोंदी मिळाल्या असल्याचे समजते तसेच रायगड जिल्हयातील ३९ हजार नोंदी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे...परंतू कोकणातली खरे समजले जाणारे रायगड जिल्ह्यातील उत्तर रायगडमधील कुणबी बांधव यांचा यात किती समावेश असेल यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे...कारण जातीने कुणबी मात्र दप्तरी नोंद शून्य त्यामुळे आता रोहा तालुक्यातील कुणबी समाज आता चांगलाच आक्रमक होत असून विभाविगातून ग्रुपनुसार युवकांच्या बैठकांवर बैठका होत असून कुणबी जातीच्या वैध प्रमाणपत्रासाठी सर्वांनी एकत्रित येण्यासाठी सर्वत्र निर्धार केला जात असल्याचे दिसून येत आहे...

जातीच्या दाखल्याचा मोठा प्रश्न?न्याय हक्कासाठी कुणबी बांधवानी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्धार

तालुक्यातील कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीण शाखा रोहा विभागीय ग्रूप खांब युवक मंडळाची सभा तालुका युवक अध्यक्ष अनंत थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली मा.आमदार स्व.पा.रा.सानप कुणबी भवन रोहा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली... समाजात जातीच्या दाखल्याचा प्रश्न मोठा निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे... या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक घेऊन आपल्या न्याय हक्कासाठी सर्व कुणबी बांधवानी जातनिहाय प्रमापत्रासाठी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून केवळ समाज म्हणून एकत्रित येण्याचा निर्धार या प्रसंगी केला आहे...

तालुक्यातील खांब कुणबी विभागाची सभा कुणबी भवन रोहा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली... यावेळी तालुका युवक अध्यक्ष अनंत थिटे,उपाध्यक्ष विजय पवार,सचिव रमण कापसे, खांब विभागीय माजी अध्यक्ष गजानन बामणे,सचिव संतोष चितळकर,मार्गदर्शक अजय कापसे,अरुण आगळे, तसेच विभागातील डॉ श्याम भाऊ लोखंडे, शशिकांत मरवडे, खरिवले, शशिकांत कडू, शशिकांत शेळके,आदी कुणबी बांधव उपस्थित होते...

आपण जन्माने कर्माने कुणबी आहोत आपणांस OBC मध्ये आरक्षण आहे

सदर सभेमध्ये आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या जातीच्या दाखल्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यांत आली आहे... आपण जन्माने कर्माने कुणबी आहोत आपणांस OBC मध्ये आरक्षण आहे...पण हे आरक्षण केवल शासनाच्या कागदोपत्री राहिले त्या आरक्षणाचा आपल्याला काही उपयोग नाही त्यासाठी अजूनही वेळ गेली नाही...आपण एकत्र येऊन आपला विषय मार्गी लावू शकतो आज जरांगे पाटील यांचा आपल्या व्हाट्सप स्टेटस ठेवण्यापेक्षा आपण त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन संघर्ष करण्यासाठी एकत्र यायला हवे असा निर्धार केला तर आपण कुणबी आहोत आणि आपल्याला जे OBC  मध्ये आरक्षण मिळाले आहे ते विना अट व त्यावरील लावलेले निकश हे सरकारने हटवले तरच आपल्याला योग्य न्याय मिळू शकेल व मिळाले पाहिजे या विचाराने सारे एकत्रित येऊन लढा देण्याची गरज भासत असल्याची चर्चा करण्यात आली...

समाजात एकच मुद्दा जातीचा दाखला आणि तो मिळालाच पाहिजे हाच निर्धार घेऊन आता रोहा कुणबी युवक विभाविभागात पेटून उठला असल्याचे दिसत असून याबाबत येत्या दोन दिवसात संबधीत अधिकारी वर्ग तसेच सामाजिक न्याय मंत्री त्याचबरोबर स्थानिक आमदार, खासदार, यांना हे निवेदन देण्यात येणार असल्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला...

तसेच सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाली यात कुणबी नोंदी शोधणेेबाबत,आपल्या शेताचे गट नंबर सर्वे नंबर शोधा भूमी अभिलेख कार्यालयातून शाळेचा दाखला ,दाखल्यावर कुणबी नोंद असेल तर मग तो कितीपण सालाचा असो ,सभासद नोंदणी,सोयरे संबंध,तसेच आपली मातृ संस्था ही १९२० सालापासून अमलात आहे मग आमच्याकडे १९६७ सालचा पुरावा अथवा अट कशासाठी ,प्रत्येक गावातून आपल्या OBC आणि सर्व समाज्याचा तपशील गोळा करून त्याचा डेटा तयार करण्यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आले आहे,जन्म मुत्यु, भूमी अभिलेख, शिक्षण, शाळा या ठिकाणी कुणबी नोंदी मिळणे शक्य आहे ,गुन्हे अन्वेष विभागात चौकशी करणे आशा विविध विषयांची सविस्तर चर्चा या सभेत करून पुढील दिशा  ठरविण्याचा निर्णय घेण्यात आला...

तसेच जातीच्या दाखल्यामुळे दिवसेंदिवस होत असलेले सामाजिक,शैक्षणीक, तसेच शासकिय नोकर भरतीतील नुकसान अर्थिक दृष्टया ही मागास याला जबाबदार सरकार असल्याने कुणबी समाज पुढे अधिक गठित होऊन वरीष्ठ पातळीवरील नेतेगण अधिक योग्य भूमिका बजावतील का तसेच या लढ्याला कितपत यश मिळते हेच पुढे पाहावे लागणार आहे...

Post a Comment

Previous Post Next Post