महाराष्ट्र वेदभुमी

रुग्णवाहिकेत महीलेची प्रसूती , डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना यश, बाळ,माता, सुखरूप .




कोलाड (श्याम लोखंडे) 

१०८ रुग्णवाहिकेची सेवा ठरली जिवनदायी

रायगड जिल्ह्यात १०८ ची रुग्णवाहिकेची सेवा उत्तम कार्यरत असून रुग्णांना तत्काळ मोफत सुविधा देणारी तसेच जीवनदायी ठरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून चक्क एका महिलेची प्रसुती (बाळंतपण) या रुग्णवाहिकेत वाहिकेतील सुविधा पुरविणारे डॉक्टर यांच्या अथक प्रयत्नांनंतर असल्याचे समजते आहे मात्र सदरच्या गरीब महीलीची प्रसूती ही नॉर्मल झाली असून तीच बाळ आणि माता हे दोघेही सुखरूप असल्याचे वाहिकेवरल कार्यरत असलेले डॉ आदिनाथ नागरे यांनी सांगितले...

या विषयाची सविस्तर माहिती अशी की पोलादपूर तालुक्यातील सह्याद्री नगर येथील सौ करिष्मा मंगेश पवार वय २३ या गरोदर असल्याने तसेच त्यांची प्रसूती तारीख व दिवस असल्याने त्यांना त्यांच्या पतीने पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात बुधवारी २२ नोव्हेंबर रोजी हलविले होते येथील उपस्थित तसेच कार्यरत असलेल्या डॉक्टर यांनी त्यांची तपासणी करून गर्भवती महिलेला एडमिट करून घेत तिला उत्तम रित्या लागणाऱ्या सुविधा सुरु केल्या तद्नंतर गुरूवारी पहाटे सदर गर्भवती महिलेच्या प्रसुतीस काही शिल्लक त्रुटी असल्यास तेथील डॉक्टरांनी सांगितले की तत्काळ यांना महाड येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात सांगीतले त्यांच्या सोबत तिचे पती आणि सासू हे दिघेंजन होते मात्र सकाळी पाच ते सहा वाजता पहाटेच्या सुमारास या महिलेला वेळेवर सुविधा मिळाव्या यासाठी ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी अत्यावश्यक सेवेतील चौवीस तास सेवा देणारी एकमेव १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधला आणि तत्काळ सेवा उपलब्ध होत सदरच्या महिलेला सुविधा प्राप्त करुन देण्यास मदत केली...

सकाळी साडे सहा वाजता पोलादपूर ग्रामीण रुग्णालयातून या रुग्णवाहिकेतून सदरच्या गर्भवती महिलेला महाड येथील जिल्हा उपरुग्णालय येथे प्रसूतीसाठी घेऊन येत असतानच पोलादपूर महाड दरम्यान टोल नाका नाजिक अचानक महिलेला कला येऊ लागल्याने रुग्णवाहिकेत उत्तम सेवा देणारे डॉक्टर नागरे तसेच महिलेचे नातलग सासू यांच्या तसेच रुग्णवाहकेतून असणाऱ्या सोयी सुविधा यांच्या यामुळे या महिलेचे ठिक ६:५५ मिनिटांनी या मातेची रुग्णवाहिकेत प्रसुतीतून उत्तम सुटका झाली असून तिचे बाळ आणि माता हे दोघेही महाड येथील रुग्णालयात सुखरूप असल्याचे डॉ नागरे यांनी सांगीतले...

प्रतिक्रया 

गर्भवती महिलेची ही दुसरी प्रसुतीची वेल असून ही प्रसुती नॉर्मल डिलिव्हरी या रुग्णवाहिकेत झाली असल्याने त्यामुळे १०८ रुग्णवाहिकेची सेवा ही अधिकच जीवनदायी सेवा जिल्हयात ठरत आहे ग्रामीण रुग्नालय पोलादपूर वरुण ग्रामीण रूग्णालय महाड येथे घेउन जातेवेली सुदैवाने या महिलेची प्रसुती नॉर्मल झाली कार्यरत रुग्णवाहिकेवरील असलेले डॉ नागरे तसेच चालक निकम,संदेश राणे यांनी या ठिकाणी या रुग्णांना सेवा देत १०८ रुग्णवाहिका सेवा ही जीवनदायी सेवा आहे हे सिद्ध केलं असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील आत्यवशक सेवेतील रुग्ण हे अधिक १०८ रुग्णवाहिकेची सेवा पसंत करतील .

....कांचन बिडवे (आहेर ) उपजिल्हा व्यवस्थापक

Post a Comment

Previous Post Next Post