शहानवाज मुकादम/रोहा
दि:१६/११/२०२३
रोहा तालुक्यात उद्या उपसरपंच पदाच्या निवडणुका!
तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक पार पडली आसुन तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी एका मंडळाचे सदस्य तर ग्रामपंचायत सदस्यपदी बहुतेक दुसर्या मंडळाचे सदस्य त्यातच अपक्षांचा पक्ष प्रवेश झाल्याने दि:१७/११/२३, रोजी च्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे...
यावर सगळीच कडे चर्चा...
उपसरपंच पदाच्या या निवडी जनतेतून विजयी होऊून सरपंच पदावर विराजमान झालेल्या नूतन सरपंचाच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असुन संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे सहाय्यक म्हणून काम पाहणार आहेत...
चणेरे विभागातील प्रत्येक पक्ष व नेते मंडळींकडून कोणत्या घडामोडी घडतात यावर स्थानिक पातळीवर अस्तित्वाबाबत प्रश्न उपस्थित होतांना दिसत आहे...सद्याच्या राजकारणात राजकीय पक्षांवर सामान्यांकडुन विश्वास राहिलेला दिसुन येत नाही....
कोण कधी कोणत्या पक्षांकडून हात मिळवणी करुन स्वार्थ साध्य करण्यासाठी सत्ताधारी पक्षात जाण्याच्या तयारीत एकदंरीत ग्रामपंचायत निवडणुका पार पडलेल्या रोहा तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर कोण विराजमान होणार? उद्या च्या निवडणुकीकडे संबंधित गावांसह तालुक्याचेही लक्ष लागून राहिले आहे...
