महाराष्ट्र वेदभुमी

अपक्ष तीन सदस्यांचा कार्यकर्त्यांसमवेत शिंदे गटात पक्ष प्रवेश.



रोहा (वार्ताहर) 

अलिबाग रोहा मुरूड चे आ. महेंद्र दळवी व तालुका प्रमुख ॲड. मनोज कुमार शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून रोहा तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या खांबेरे ग्रामपंचायतीचे निवडून आलेले अपक्ष उमेदवार नरी विलास शिद, सिद्धी सुनिल कासार, सुधीर ठाकूर यांनी आपल्या वॉर्डातील व गावातील असंख्य कार्यकर्त्यांसमवेत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे...

यावेळी चणेरा उपविभाग प्रमुख शैलेश सकपाळ, सहसंपर्कप्रमुख भालचंद्र मोरे, मनोहर बोले, रामा शेरेकर, महेश शिंदे, नितीन शेडगे, भालचंद्र जाधव, संतोष देवळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आ. महेंद्र दळवी यांनी सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले आहे. तालुक्यातील चणेरा विभागात गेली अनेक वर्षापासून विकास कामांच्या जोरावर शेकाप पक्षाच्या नेत्यांनी या भागातील अनेक ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व कायम राखत लालबावटा फडकवला आहे. या भागात राष्ट्रवादी पक्ष हा शेकापचा राजकीय शत्रू आहे. हा भाग अलिबाग मुरुड मतदारसंघात येत असल्याने स्थानिक शिंदे गटाचे आ. महेंद्र दळवी यांनी या भागातून शेकापला हद्दपार करण्यासाठी राजकीय व्यूरचना रचली आहे...

प्रतिष्ठेची आणि बहुचर्चित खांबेरे ग्रामपंचायत म्हणजे शेकापचा बालेकिल्ला ओळखला जातो. मात्र या विभागात शेकापमधील असलेले अंतर्गत मतभेद या संधीचा फायदा घेत शेकापला नामोहरम करण्यासाठी नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक ग्राम पंचायत निवडणुकीत शिंदे गटाने राष्ट्रवादी पक्षाशी हात मिळवणी केली. या आघाडीच्या जोरावर राष्ट्रवादीचे थेट सरपंच पदाचे पुरस्कृत उमेदवार आतिश मोरे यांनी बाजी मारल्यानंतर शिंदे गटाने उपसरपंच पद मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्या. या ग्रामपंचायतीत एक सदस्य निवडून आणून शिंदे गटाने खाते उघडले, तर निवडून आलेल्या तीन अपक्ष सदस्यांना शिंदे गटाचा विश्र्वास संपादन करत प्रवेश घेऊन आपली बाजू अधिक मजबूत केली आहे. एकंदरीत शेकपला अधिक नामोहरम करून शिंदे गटाने आपले वर्चस्व सिद्ध करून उपसरपंच पदावर दावा केला आहे. त्यामुळे नुकताच ग्रामपंचायत निवडणुका पार पाडल्या. येता 17 नोव्हेंबर रोजी उपसरपंच पदासाठी निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्भूमीवर शिंदे गटाने आपले राजकीय गणित मांडून आपली ताकद दाखवण्याचा काम जोरदार सुरू केला असल्याचे दिसून येत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post