रोहा चणेरा (शहानवाज मुकादम.)
सर्वसामान्यांची दिवाळी आनंदात साजरी होईल -मंत्री अदिती तटकरे...
तालुक्यातील शेडसई दुकानदार श्री धर्माजी कोळी यांच्या भागिर्थीखार येथील दुकानात शिधावाटप कार्यक्रम मंत्री अदितीताई तटकरे यांच्या उपस्थितीत व हस्ते वाटप झाले...पुर्ण राज्यात दीपावली साजरी होत आसतानाच गोरगरिब वंचित राहू नये अशा शासन धोरणाचे नागरिक स्वागत करित आहेत.नागरिकांसाठी दिवाळी आनंदाने व गोड पदार्थाने साजरी व्हावी यासाठी शासनाने “आनंदाचा शिधा” किटचे वाटप राज्यभर केले आहे. आनंदाच्या शिधा या उपक्रमातुन सर्वसामान्यांची दिवाळी आनंदाची व्हावी अशा शुभेच्छा किट वाटप कार्यक्रमात मंत्री महोदया कु .अदिती तटकरे यांनी शिधापत्रिका धारकांना दिल्या...
या कार्यक्रमास तहसील कार्यालयातील मा.पुरवठा अधिकारी,सौ. उज्वला अंधेरे/भोईर, अभिजित महाडिक आण्णा, गोडाऊन इन्चार्ज जंगमआण्णा, व अन्य अधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी कोकबण ग्रामपंचायत च्या नव निर्वाचित सरपंच श्रीम वाजंत्री मॅडम, चणेरे विभागातील खंबीर नेतृत्व श्रीमान हरिश्चंद्र वाजंत्री,माजी सभापती श्री सकपाळ व अन्य पदाधिकारी,ग्रामस्थ आणि दै.रायगड स्वाभिमान न्युज चे संपादक श्रीमान रघुनाथ कडु सर,प्रतिनिधी श्री सचिन ठाकुर उपस्थित होते...
सदरचा शिधावाटप कार्यक्रमानंतर मंत्री महोदया कु.अदिती तटकरे यांचे कडे चणेरा विभागातील अन्य प्रश्न पत्रकारांनी यावेळी विचारले समंधीत एक दोन प्रश्नांना मंत्री महोदय यांनी उत्तर दिले मात्र अन्य विभागातील विविध प्रश्न विचारून उत्तर जाणून घ्यायचे असतांनाच मंत्री महोदया अर्धवट निघून गेल्याने पत्रकार नाराज झाले...
*पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न* रेशन दुकानातील शिधावाटपा बाबत होत असलेला विलंब याचे कारण काय..?
म्हसाडी धरणाचे काय झालं,तरुणांची बेरोजगारी समस्या दिवसेंदिवस वाढत आहे यावर नवीन धोरण आपला काय असेल..?धाटाव एमआयडीसी कंपनीच्या केमिकल युक्त पाणी सोडल्याने कुंडलिका नदी प्रदुषित होऊन हजारो माशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रोह्या दि:०९/११/२३, रोजी बघाव्यास मिळाली याविरोधात समंधीतांवर कारवाई करणार का..?
असे अनेक प्रश्नांची उकल करण्यात येणार होती मात्र मंत्री महोदया कु.अदिती तटकरे यांच्या कडे वेळ नसल्याचे बोलुन त्या निघून गेल्या...
अशा महत्वाकांक्षी प्रश्नांवर स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार खासदार एक शब्द बोलतांना दिसत नाही हे आमच्या रोह्या चे दुर्भाग्य आहे.अशी खंतही यावेळी नागरिकांकडून होतांना दिसत आहे म्हणून हे प्रश्न मांडण्याचा मानस या निमित्ताने होता...
तरी मा.राज्य मंत्री कु.अदिती तटकरे साहेब चणेरे विभागात ही योजना दिपावली आधी या किटचा वाटप पुर्ण होईल का असा प्रश्न समस्त नागरिक उपस्थित करीत आहेत...
