अलिबाग, विशेष (प्रतिनिधी):
गुरुवारी सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू
शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते अजित माळी यांचा गुरुवारी सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला...त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे...
अडीच महिन्यांपासून मुंबई येथील जे.जे.रुग्णालयात त्यांच्यावर होते उपचार सुरू
अजित माळी यांनी राजकीय, सामाजिक व क्रिडा क्षेत्रात कमी कालावधीत एक वेगळी भरारी घेतली होती...चेंढरे ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून त्यांनी सेवा केली आहे... तरुणांसाठी क्रीडा,सांस्कृतिक आदी वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांना व्यासपिठ मिळवून दिले आहे...गेल्या अडीच महिन्यांपासून मुंबई येथील जे.जे.रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते... दरम्यान गुरुवारी त्यांचे निधन झाले...
