अलिबाग (ओमकार नागावकर):
चौल आग्राव मुख्य रस्त्याचे नूतनीकरण केलेले काम थुकपट्टी लावून दिल्यामुळे रस्त्याला मोठ मोठे खड्डे
अलिबाग : कार्यकारी अभियंता महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था रायगड अलिबाग यांच्या कार्यालयात दि.९ नोव्हेंबर रोजी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी धडक दिली... चौल आग्राव मुख्य रस्त्याचे नूतनीकरण मे २०२२ रोजी सुमारे २.५ कि.मीचा रस्ता १ कोटी २६ लाख रुपये खर्च करून करण्यात आला होता परंतु एक वर्षात रस्ता वाहून गेला कारण रस्त्याचे काम हे पक्के थुक पट्टी लावून करण्यात आला होते... त्यामुळे रस्त्याला मोठ मोठे खड्डे पडले आहेत...त्यामुळे ग्रामस्थांना त्रास तर वाहने चालविणाऱ्यांना आपली कंबर तोड करावी लागते... जनतेचे हाल होताना दिसत असून सुद्धा दुर्लक्ष करत असाल तर खुर्च्या खाली करा... लगोलग आठ दिवसात काम सुरू करून रस्ते दुरुस्त करा अन्यथा तीव्र मोर्चा काढू असा इशारा जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी दिला...
यावेळी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, चौल ग्रामपंचायत उपसरपंच अजित गुरव, विभाग प्रमुख मारुती भगत, शिवसैनिक शैलेश घरत, शिवसैनिक केदार मळेकर व पदाधिकारी उपस्थित होते...
पत्रव्यवहारात काय लिहिले होते
CMGSY योजने मार्फत चौल आग्राव मुख्य रस्त्याचे नूतनीकरण केले परंतु केलेले रस्त्याचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून काही ठिकाणी रस्त्याला मोठ मोठे खड्डे पडले आहेत...तसेच काही ठिकाणी रस्त्याचे कारपेट हे पूर्णपणे उखडून खडी पसरली आहे...आपण नविन केलेल्या कामाची अशी दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही...याबाबत आपल्याबरोबर वेळोवेळी पत्रव्यवहार करुन सुद्धा आजतागायत आपल्या कार्यालयाकडून हा रस्ता दुरुस्तीबाबत कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. स्थानिकांना खड्ड्यांचा त्रास होऊन नागरिकांत प्रचंड प्रक्षोभ होत आहे. तरी येत्या चार दिवसांत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने चालू करावे अन्यथा सोमवार दिनांक १२/०६/२०२३ रोजी आपल्याविरोधात उग्र आंदोलन केले जाईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी...

