महाराष्ट्र वेदभुमी

कोलाड लायन्स क्लबची सामाजिक बांधिलकी,रोहा मुठवली येथे शौचालयाचे भूमिपूजन



कोलाड : विशेष प्रतिनिधी 

रोहा तालुक्यातील कोलाड विभागात कोलाड लायन्स क्लब ही समाज सेवी संस्था गेली तीन वर्ष विविध क्षेत्रात अग्रेसर काम करत आहे...या अनुषंगाने सामाजिक बांधिलकीतून लायन्स क्लब ऑफ इंटनॅशनल ३२३१ ए ४ चे डिस्ट्रिकचे द्वितीय उप प्रांतपाल यांच्या वतीने व कोलाड क्लबच्या विशेष सहकार्याने तालुक्यातील मौजे देवीची मुठवली येथे उभरण्यात येणाऱ्या सुसज्ज शौचालयाचे भूमिपूजन डिस्ट्रिक उप प्रांतपाल एम जे एफ लायन संजीवनी सुर्यवंशी यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न करण्यात आले...


यावेळी प्रमुख उपस्थितीत डिस्ट्रिकचे पहिले उप प्रांतपाल एम जे एफ लायन एन आर परमेश्वर , जी एस टी कॉर्डनेटर प्रविणजी सरनाईक,गणात्रा,लेडी लायन नमिता मिश्रा,लायन मिश्रा,कोलाड क्लबचे मार्गदर्शक लायन रवींद्र घरत,कोलाड लायन्स क्लबचे अध्यक्ष नरेश बिरगावले,संस्थापक अध्यक्ष डॉ सागर सानप,सेक्रेटरी अनिल महाडिक, उपाध्यक्ष डॉ विनोद गांधी, डॉ श्याम लोखंडे,बोर्ड ऑफ डायरेक्टर रविंद्र लोखंडे,लायन महेश तुपकर,आदी लायन मेंबर तसेच गाव कमिटी अध्यक्ष संजय तुपकर, ग्राम पंचायत सदस्य... मारुती तुपकर, योगेश शिंदे, श्रीमती कविता शेलके, भवानी माता देवस्थानाचे पुजारी सुदाम शिंदे, गावचे पोलिस पाटील पाटील ह.भ.प. राम सावंत, उपाध्यक्ष रवींद्र शिंदे,नामदेव शिंदे,जगदीश शेलके, नरेश तुपकर, महेश शेलके,लिंबाजी शेलके, भगवान तुपकर, तुलसीराम शेलके, आदि ग्रामस्थ प्रसंगी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते...


तालुक्यातील मौजे मुठवली येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आराध्य दैवत भक्तांच्या हाकेला धावणारी नवसाला पावणारी मनातील भक्तांना कौल देणारी देवी आई रत्नाई माता (भवानी माता) मंदिर सभागृह परीसरात येथे श्रध्देने येणाऱ्या भक्तांसाठी सुसज्ज असे शौचालय लायन्स क्लब ऑफ कोलाड यांच्या सामाजिक बांधिलकीतून उभारण्यात येणाऱ्या शौचालयाचे भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला तर सदरच्या शौचालयात स्त्रिया आणि पुरुष यांना वेगवेगळे शौचालय आणि मुतारी असणार आहेत तसेच मंदिरात प्रवेश करण्याआधी भाविकांना हात पाय धुण्याची ही सुसज्ज अशी व्यवस्था लायन्स क्लबच्या माध्यमातून करण्यात येणार आहे...

Post a Comment

Previous Post Next Post