अलिबाग (ओमकार नागावकर) :
महाराष्ट्रातून २० जिल्ह्यातील स्पर्धक,वेगवेगळ्या गटांमधुन ३५० मुलांचा सहभाग
चौथी राज्यस्तरीय लाठीकाठी अजिंक्य स्पर्धेत रायगड संघाने रोवला मानाचा तुरा...ही स्पर्धा दि. १८, १९ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्ष दक्षिण रायगड व लाठीकाठी असोसिएशन यांच्यामार्फत अलिबाग येथील आरसीएफ संकुल येथे घेण्यात आली. राज्यस्तरीय झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातून २० जिल्ह्यातील स्पर्धक आले होते... स्पर्धेत वेगवेगळ्या गटांमधुन एकुण ३५० मुलांनी सहभाग नोंदवला होता...
सदर कार्यक्रमास पनवेल आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या तसेच उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते, भाजप उपाध्यक्ष दिलीप भोईर, भाजप जिल्हा उपाध्यक्षा ॲड. पल्लवी तुळपुळे, अलिबाग-मुरूड विधानसभा आमदार महेंद्र दळवी, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे आदी मान्यवर उपस्थित होते... महाराष्ट्र लाठीकाठी असोसिएशनचे महागुरू सुभाष मोहिते, अध्यक्ष युसुफ मुल्ला, सचिव सुराज मोहिते, अजय शहा, रफीक शेख, शिवराम भोसले व रायगडचे लाठीकाठी अध्यक्ष प्रमोद मसाल उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीपणे पारपाडण्यासाठी संदेश गुंजाळ, रायगड सचिव सौ.प्रियांका गुंजाळ व ॲड.पल्लवी तुळपुळे यांनी विशेष परिश्रम घेतले...
स्पर्धेत रायगड संघाला सुवर्णपदक, उस्मानाबाद संघाला रौप्यपदक, तर सोलापूर संघाला कास्य पदक देवून गौरविण्यात आले. राज्यस्तरीय लाठीकाठी स्पर्धेसाठी एकूण २० जिल्ह्यातून ३५० स्पर्धकांनी वेगवेगळ्या गटातून सहभाग नोंदविला. एकं लाठी, द्वी लाठी, द्वीअनिका, पंचनिका, काट पवित्रे, मरुं, अश्टं, मघुरा असे पवित्रे या लाठीकाठी स्पर्धेत घेण्यात आले. राज्यस्तरीय स्पर्धेत पारंपारिक खेळात सुवर्ण पदक मिळवून रायगड जिल्ह्याचे, अलिबाग तालुक्याचे नाव मोठे केल्याबद्दल रायगड संघाचे सर्वत्रीत अभिनंदन होत आहे...या मिळवलेल्या अतुलनीय यशाबद्दल भारतीय जनता पक्ष दक्षिण रायगड व लाठीकाठी असोसिएशनचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे...

