महाराष्ट्र वेदभुमी

नेमकी बाजी कोण मारणार?

 


शहानवाज मुकादम/रोहा

खांबेरे ग्रामपंचायत ३ पक्षाचे सरपंच उमेदवार विरुद्धअपक्ष थेट सरपंच उमेदवार श्री कासार यांच्यात चुरस!

चणेरा विभागातील ४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ऐन दिवाळीच्या सुमारास लागल्याने यामध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी व मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार “लक्ष्मी” दर्शन  झाल्याची चर्चा असुन  ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळविणे जिल्ह्यातील अनेक पक्षीय नेत्यांच्या इभ्रतीचा प्रश्न ठरणार आहे...

चणेरा विभागात ४ मोठ्या ग्रामपंचायतीचा समावेश असून यामध्ये कोकबण, न्हावे, चणेरा, खांबेरे  ग्रामपंचातींच्या निवडणुकीचे निकाल मतदान पेटीत बंद...

तसेच ग्रामपंचायत खांबेरेमध्ये शेकापक्ष, एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी पक्षाचे एकुण ३ थेट सरपंच उमेदवार विरुद्ध थेट सरपंच (अपक्ष) उमेदवार श्री आत्माराम कासार व त्यांचे पॅनल यांच्यात चुरस बघाव्यास मिळाली असून सर्व पक्ष विरुद्ध अपक्ष यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून सोमवार दि:०६/११/२३, रोजी तालुक्यात निकाल जाहीर होणार आहे...

कोकबण, न्हावे, चणेरामध्येही शेकापक्ष, भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादीत देखील चुरस बघावयास मिळाली... तर खांबेरे ग्रामपंचायतमध्ये थेट सरपंच पदाची बाजी कोण मारणार?

माजी आमदार श्री.पंडित शेठ पाटील (शेकापक्ष),अमदार श्री.महेंद्र दळवी (शिंदे गट), आणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व पंचायत समिती रोहाचे माजी उपसभापती(राष्ट्रवादी) यांच्यासाठी ग्रामपंचायतीत विजय मिळविणे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे...

तसेच ग्रामपंचायतीचा निकाल हा पंचायत समिती रोहा,जिल्हा परिषद,आणी अलिबाग मुरुड विधानसभेचा भावी अमदारांना निर्णायक ठरणार आहे...

थेट सरपंचाचे अपक्ष उमेदवार श्री अत्माराम कासार व त्यांचे पॅनलसाठी ग्रामपंचायतीत सत्ता राखणे प्रतिष्ठेचे ठरणार आहे...

Post a Comment

Previous Post Next Post