शहानवाज मुकादम/रोहा
रेवदंडा-साळाव रोडवर राहदारीस अडथळा करीत उभ्या ट्रक ला पाठीमागून मिनीडोअर ची ठोकर,
तीघे गंभीर जखमींवर पनवेल लाइफलाइन रुग्णालयात उपचार सुरु.
दि:06/11/23, रोजी वेळ 22वा.च्या सुमारास रोहा-साळाव बाजूकडील जाणाऱ्या रस्त्यावर मेन रोडवर म्हाडा कॉलनी कमाणी जवळ सार्वजनिक रस्त्यावर ट्रक क्र: MH.46.F2941हा ट्रक इंडीकेटर न देता मेन रस्त्यावर रहदारीस अडथळा होइल आश्या धोकादायक स्थितीत निष्काळजीपणे हयगयीने ट्रक उभा करून रहदारीचे कोणतेही नियमांचे पालन केलेले नाही...
पाठीमागून चणेरे कडे जात आसलेली मिनीडोअर क्र:MH.06.S.5382 हीने उभी असलेल्या ट्रक ला पाठीमागून जोरदार ठोकर दिल्याने हा अपघात घडला. .
सदर च्या मिनीडोअर चे चालक श्री उमाजी मारुती शिंदे वय48 वर्ष, व प्रवासी श्रीम उज्वला उमाजी शिंदे वय42 वर्ष,श्री समीर दिलीप शिंदे वय40 वर्ष, यांना लहान मोठ्या स्वरुपाच्या गंभीर दुखापती झाल्या आहेत...
जखमींवर पनवेल लाइफलाइन रुग्णालयात उपचार सुरु असलयाची माहिती मिळत आहे...
या प्रकरणी श्री महेश महादेव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोहा पोलीस ठाण्यात कॉ.गु.र.नं.173/2023,भा.द.वी. कलम 283,279,337,338 एम व्ही ए 184 अन्वये आरोपी ट्रक चालक विरुद्ध गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक करण्यात आली आहे..
या प्रकरणी पो, हा,/2041,श्री एस,एम,अधिकारी पुढील तपास मा.पोलीस निरीक्षक श्री प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनात करीत आहे...
सदरची माहिती पोलीस हवालदार श्री पेडवी यांनी दिली..
