महाराष्ट्र वेदभुमी

आदिवासी शिक्षक भिवा पवार यांचे कुटुंबासह आमरण उपोषण!



कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे ) (नंदकुमार कळमकर)

आदिवासी दिन साजरा केला म्हणून केली जिल्हा बदली

रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाज घटकाला नेहमी मदतीचा हात ठेवून आदिवासी समाजाच्या नेहमी शैक्षणिक सामाजिक विकासासाठी नेहमी कटिबद्ध असणारे रोहा तालुक्यातील चिंचवली तर्फे दिवाळी आदी वाडी येथील शिक्षक भिवा पवार  यांचे छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेने तडका फडकी जिल्हा बदली करून दोन महिने वेतनापासून वंचित ठेवल्याने १८ ऑक्टोंबर  रोजी ते आपल्या कुटुंबासह छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेच्या आवरात ते कुटुंबासह  उपोषण करणार आहेत...

त्यांनी  प्रसिद्धीसाठी पत्रकारांना  दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेच्या ठाणे व रायगड जिल्ह्यांमध्ये अनेक पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ विद्यालय असून एक पदवी विद्यालय आहे या संस्थेच्या प्रगतीमध्ये आदिवासी बहुजन समाजाचा सिंहाचा वाटा आहे या संस्थेच्या शहरी ग्रामीण आदिवासी दुर्गम भागात शाळा आहेत...शिक्षक भिवा बळीराम पवार सहाय्य शिक्षक म्हणून सरस्वती विद्यामंदिर वडघर मुद्रे तालुका माणगाव जिल्हा रायगड या विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होतो आदिवासी समाजाचा असल्याने आदिवासी समाजाची बांधिलकी म्हूणन आदिवासी समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी कार्य करीत असतो...आदिवासी समाजाच्या त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी म्हणून ९ऑगस्ट २०२३ रोजी आम्ही माणगाव जि. रायगड येथे आदिवासी बांधवांबरोबर जागतिक आदिवासी दिन साजरा केला. यामध्ये ४००० आदिवासी बांधव उपस्थित होते... त्याचवेळी काही राजकीय पक्षाने आदिवासी मेळावा घेतला होता तिथे आदिवासी बांधव कोणीही गेले नाहीत याचा राग मनात धरून मी ज्या शिक्षण संस्थेत नोकरीला आहे त्या छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेने दिनांक ०९/०८/२०२३ रोजी संस्थेची सरचिटणीस श्री निलेश रेवगडे यांनी ठराव घेऊन त्याच दिवशी माझी बदली शारदा विद्यालय पडघा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे या ठिकाणी केली...व मला दिनांक १४/८/ २०२३ रोजी शारदा विद्यालय पडघा येथे हजर राहण्यास सांगितले...हजर न राहिल्यास नोकरीवरून काढून टाकू अशी धमकी दिली शिक्षक पवार यांना दिली असल्याची माहिती शिक्षक भिवा पवार यांनी पत्रकारांना दिली...

एका शाळेत एका शिक्षकाची होते पाच वेळा बदली. ॲट्रॉसिटी ॲक्टची मागणी, अनेक संघटनांना दिले .

 तर १६ वर्षाच्या कालावधीमध्ये आतापर्यंत पाचवेळा बदली जाणून बुजून करण्यात आलेली असून सरस्वती विद्यामंदिर वडघर मुद्रे (ता.माणगाव ) या शाळेमध्ये कार्यरत असताना तेथील शिक्षकाने चार वेळा कल्याण ठाणे येथे बदलीसाठी अर्ज केले होते पण त्याची बदली न करता  मी आदिवासी कातकरी समाजाचा असल्यामुळे जाणून-बुजून जातीय द्वेषातून माझी जिल्हा बदली (पडघा -भिवंडी ) येथे बदली की करण्यात आली...मी माझी जिल्हा बदली करू नये म्हणून मी संस्थेत दि.१२/८/२०२३रोजी विनंतीपत्रही दिले संस्थेचे सरचिटणीस श्री निलेश रेवगडे यांना प्रत्यक्ष भेटून विनंती केली तसेच माझी मुले ही गोरेगाव माणगाव येथे मुलगी ११ वी सायन्स मध्ये तर मुलगा बीएससी द्वितीय वर्षात शिकत आहे त्यांचे ऍडमिशन पूर्ण झाले आहे त्यांना आता इतरत्र प्रवेश मिळणार नाही तसेच माझे आई-वडिलांची वयोवृद्ध असल्याने सतत आजारी असतात त्यांचा मी एकुलता एक मुलगा असल्याने त्यांची सेवा करण्यासाठी रायगड जिल्ह्यात कुठेही बदली करा जिल्हाबाहेर बदली करू नका अशी अनेक वेळा विनंती केली प्रत्यक्ष सानपाडा येथे भेटून विनंती केली..तीही विनंती मान्य न करता तुम्ही निमुटपणे हजर व्हा नाहीतर नोकरी जाईल अशी धमकी दिली तसेच मला अनेक वेळा कल्याणला बोलवून तिथे गेल्यानंतर मला फोन करून मला आता वेळ नाही नंतर भेटू असे बोलून माझी तीन वेळा अवहेलना करण्यात आली करण्यात आली...आदिवासी विद्यार्थ्यांची असलेला जनसंपर्क उत्कृष्ट अध्यापन आदिवासी मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावी म्हणून केलेली  धडपड तळमळ हे लक्षात घेऊन सरस्वती विद्यामंदिर वडघर मुद्रे ता माणगाव या परिसरातील १५ गावांमधील ग्रामस्थांनी आम्हाला हेच शिक्षक पाहिजे म्हणून दि १४/८/२३ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नागनाथ सुर्वे यांना ५८ सह्यांचे निवेदन दिले. मुख्याध्यापक नागनाथ सुर्वे यांनी पत्रव्यवहार करून तुमच्या प्रतिक्रिया मी संस्थेला कळवितो असे सांगितले...

त्यानंतर संस्थेने बदलीबाबत काहीही न केल्याने दि.०१/०९/२०२३ पुन्हा वडघर परिसरातील पंधरा गावातील व आदिवासी बांधवांनी  पुन्हा मुख्याध्यापक नागनाथ सुर्वे यांना  लेखी निवेदन दिले...त्यावेळी आदिवासी बांधवांनी सरचिटणीस साहेबांना फोन करा असे सांगितले असता मोठ्या प्रयत्नाने मुख्याध्यापक सुर्वे यांनी संस्थेचे सरचिटणीस श्री रेवगडे यांना मोबाईल वरून सर्व ग्रामस्थ समक्ष  संपर्क केला असता मी श्री भिवा पवार सर यांना सात सप्टेंबर रोजी शाळेमध्ये स्वतः घेऊन येईल असे सर्व ग्रामस्थांसमोर  सांगितले...मात्र सात सप्टेंबर जाऊन एक महिना पूर्ण व्हायला आला अद्याप बदली केली गेली नाही...तसेच अभिनव ज्ञान मंदिर हायस्कूल उसर खुर्दता तळा बदली झालेले शिक्षकाने मी शारदा विद्यालय  पडघा येथे जाण्यास तयार आहे असे व मी उसर तालुका तळा येथे जाण्यास तयार आहे...असे सहमतीने  बदली अर्ज निवेदन  दि.१३/९/२०२३ रोजी छत्रपती शिक्षण कल्याण या संस्थेच्या कार्यालयात दिले...मात्र संस्थेचे सरचिटणीस श्री निलेश रेवघडे यांनी या निवेदनात सुद्धा केराची टोपली दाखवली...

दोन महिने वेतनापासून ठेवले वंचित कुटुंबावर उपासमारीची पाळी, वरिष्ठ वेतन श्रेणीही नाही

तसेच ज्यांची बदली झालेली होती त्या कर्मचाऱ्यांनी आर्थिक देऊन देवाण-घेवाण घेऊन पाहिजे ते शाळेवर पुन्हा करून घेतल्याची चर्चा आहे अशी अनेक शिक्षकांची नावे आहेत...मात्र मला त्रास देणे पोटीच माझी बदली जाणीवपूर्वक करण्यात आली  कारण मी आदिवासी समाजाबरोबर आदिवासी दिन साजरा केला होता...ती आदिवासी दिनाला आदिवासींची ४००० संख्या होती...व पुढाऱ्यांच्या मेळाव्याला आदिवासीच नव्हते...याचाच राग मनात धरून माझी जिल्हा बदली करण्यात आली असल्याचे बोलले...शारदा विद्यालय पडघा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे या विद्यालयात मी दि.१४/०८/२०२३ रोजी हजर झालो मात्र या महिन्याच्या आक्टोबर महिना आला तरी वेतन काढले नाही या विद्यालयात अन्य कर्मचारी बदली होऊन आले त्यांचे वेतन काढण्यात आले  मात्र जाणून-बुजून मला त्रास देण्याच्या सूडबुद्धीने तसेच माझी आर्थिक कोंडी व्हावी,नुकसान व्हावे, उपासमार व्हावी म्हणून माझे पगार काढण्यात आलेले नाही...मी आदिवासी कातकरी समाजातील असून मी बँकेकडून घेतलेले गृह कर्ज घेतली आहे...त्याचा हप्ता न भरल्याने  त्याचा दंड भरावा लागणार आहे तसेच माझे आई-वडिलांच्या औषध उपचारासाठी पैसे सुद्धा पाठवता आले नाहीत...तसेच माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी पैसे सुद्धा पाठवता आले नाहीत...त्यामुळे माझ्या कुटुंबाची उपासमार करून माझे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण करण्यात येत आहे...एकीकडे शासनाने आदिवासी समाज शिकला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करत आहे तसेच आदिवासी कातकरी आदिम जमातीत असून मोठ्या प्रमाणामध्ये शासन प्रधान्य देत आहे...मात्र छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेचे सरचिटणीस श्री. निलेश रेवगडे, व संस्थाचालक मी आदिवासी असल्याने जातीय द्वेषातून प्रशासकीय बदली अधिकाराचा गैरवापर करून जिल्हा बदली करून  माझे व माझ्या कुटुंबाचे आर्थिक शारीरिक मानसिक शोषण करीत आहेत...

महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली १९८१ तील नियम ४१ बदल्या(१)या नियमवलीतील तरतुदीच्या अधीनतेने प्रशासकीय कारणासाठी बढतीमुळे  किंवा संबंधित कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरून झालेल्या बदल्या वगळता एरवी जर तसे करणे प्रशासकीय दृष्ट्या सोयीचे असेल तर एकाहून अधिक शाळा चालविणारा व्यवस्थापक वर्ग आपल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची बदली करणार नाही असा स्पष्ट नियम असताना संस्था या बदली नियमांचा गैरवापर करून आदिवासी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना सूडबुद्धीने जाणीवपूर्वक गैरसोयीचे अन्यायकारक त्रासदायक बदल्या केल्या जातात.  कर्मचाऱ्यांची मवी,१२ वीला असताना  कर्मचाऱ्यांची बदली करू नये असा नियम असताना सुद्धा २०१९ला माझा मुलगा दहावीला असताना माझा माझी बदली करण्यात आली. अशा एकूण माझ्या ५ वेळा बदल्या करण्यात आले...आता माझा मुलगा बीएससी दुसरे वर्ष व मुलगी अकरावी सायन्सला(निटचा अभ्यासक्रम)असताना त्या कॉलेजला ऍडमिशन घेतले असताना ऐनवेळी दि.१४/८/२०२३ रोजी बदली करण्यात आली म्हणजे माझी मुलं शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला की मी मागासवर्गीय असल्यामुळे जाणून-बुजून संस्थाचालक सरचिटणीस निलेश रेवगडे यांच्याकडून करण्यात आले...

 या उलट संस्थेतील संस्थाचालकांच्या नातेवाईकांना  विशेष सोयीच्या घराजवळील जवळील शाळा दिल्या जातात... संस्थेतील अनेक कर्मचाऱ्यांची संस्थेची सख्य असणाऱ्या  लोकांची ३० वर्षात एकदाही बदली केलेली नाही...पदोन्नती भरती देताना अनेक मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना डावलले जात आहे संस्थेतील मर्जीतील कर्मचाऱ्यांना बढती दिली जाते... वरिष्ठ वेतन श्रेणी ही १२ वर्षांनी दिली जाते  मात्र परीक्षा पास होऊनही माझ्या सेवेला १६ वर्षे झाली म्हणजे ४ चार वर्षे आधीक होऊनही मला वरिष्ठ वेतनश्रेणी दिली नाही हा माझ्यावर झालेला मोठा अन्याय आहे...आणि मी आदिवासी कातकरी असल्यामुळे हे संस्थेकडून जाणून केले जात आहे...


म्हणून संस्थेचे श्री निलेश रेवगडे. तसेच या कटामध्ये सामील असणारे छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण रायगड विभाग प्रमुख श्री.महादेव जाधव रायगड जिल्ह्याबाहेर बदली व्हावी म्हणून सूचक श्री.महेश देशपांडे,अनुमोदक श्री किशोर आल्हाट, बदलीसाठी रायगडातून शिफारस करणारे सरस्वती विद्यामंदिर वडघर ता.माणगाव जि. रायगड  मुख्याध्यापक श्री नागनाथ दत्तात्रय सुर्वे  यांच्यावर अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंवारधात्मक (ॲट्रॉसिटी ॲक्ट) कायद्यानुसार कारवाई व्हावी म्हणून ते स्वतः व कुटुंब छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण टिळक चौक कल्याण(प)  दिनांक १८ /१०/२०२३रोजी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण  उपोषण करणार आहे...या निवेदनाची प्रत त्यांनी अनुसूचित जाती जमाती आयोग नवी दिल्ली, शिक्षण संचालक पुणे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद, पोलीस उपयुक्त कल्याण,वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजारपेठ पोलीस स्टेशन, शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद रायगड,मराठी पत्रकार परिषद  कार्याध्यक्ष महाराष्ट्र ,रायगड प्रेस क्लब सलग्न रोहा प्रेस क्लब,सर्वहरा जन आंदोलन अध्यक्षा श्रीमती उल्काताई महाजन,बहुजन युथ राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव,महाराष्ट्र आदिम जमात कातकरी महाराष्ट्र राज्य,राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (प्रोटॉन)बहुजन वंचित आघाडी रायगड,माणगाव तालुका आदिवासी संघटना, रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटना,ऐनघर पंचक्रोशी ग्रामीण युवा बेरोजगार संघटना रोहा यांना निवेदन देण्यात आलेले आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post