महाराष्ट्र वेदभुमी

रोहा रा.जि.प.शाळा पुगाव येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप.



पुगाव - खांब (नंदकुमार कळमकर) 

जि.प. केंद्र शाळा पुगांव येथील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणीक साहित्यचे वाटप

युवकांचे प्रेरणास्थान आधारस्तंभ विकासाचे शिलेदार सर्वसामान्यांचे नेते कार्यतत्पर कर्तव्यदक्ष आ अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे विश्वासू सहकारी उद्योजक तसेच पुगाव गावचे सुपुत्र प्रमोद म्हसकर यांच्या सहकार्याने रा.जि.प. केंद्र शाळा पुगांव येथील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणीक साहित्यचे वाटप करण्यात आले,..

१५ ऑक्टोबर २०२३ रोजी लोकप्रिय कार्यतत्पर कोकण स्वराज्य संस्था विधान परिषदेचे युवा आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १७ आक्टोबर २०२३ रोजी त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी, यशस्वी युवा उद्योजक, पुगाव मधील दानशूर व्यक्तिमत्व प्रिय प्रमोदजी म्हसकर यांनी येथील रायगड जिल्हा परिषद शाळा-पुगाव येथील इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले...

महिला वर्ग व पालक वर्ग आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित 

मोठ्या उत्साही वातावरण लाभलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत पुगांव सरपंच सौ नेहा म्हसकर, उपसरपंच व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ नीलम कळमकर पुगावचे माजी उपसरपंच ज्येष्ठ मार्गदर्शक अनंत म्हसकर, ग्रामपंचायत सदस्य सौ रचना कळमकर सौ आदिती झोलगे, पुगावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर शेळके, शाळेचे मुख्याध्यापक निवास थळे सर, सहशिक्षक प्रसाद साळवी ,अंगणवाडी सेविका रुजूता देशमुख मॅडम, मदतनीस शोभा देशमुख,सह महिला वर्ग व पालक वर्ग आदी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते...


सदरच्या कार्यक्रमात सुधीर शेळके यांनी तसेच उपस्थीत मान्यवरांनी याप्रसंगी विद्यार्थी वर्गाला मोलाचे मार्गदर्शन केले तर सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद साळवी सर यांनी करत युवा उद्योजक प्रमोद म्हसकर यांनी आ.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त येथिल विद्यार्थ्यांना सुंदर असे वाटप केलेले शैक्षणिक साहित्याचे विशेष कौतुक करत उपस्थीत सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले...

Post a Comment

Previous Post Next Post