महाराष्ट्र वेदभुमी

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात इनकमिंग..मुरुड तालुक्यातील किशोर काजारे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश



 अलिबाग (ओमकार नागावकर) :

मुरुडमधील असंख्य कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत केला प्रवेश 

दि.१० ऑक्टोंबर रोजी रायगड जिल्हयातील मुरुड तालुक्यातील धाडसी नेतृत्व असलेले किशोर काजारे यांच्यासह मुरुडमधील असंख्य कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला... मुरुड तालुक्यात मोठी जबाबदारी दिली जाणार आहे....त्यामुळे आगामी काळात राजकीय लढत पाहायला मिळू शकते...काही दिवसातच ग्रामपंचायतीच्या निवडणूका घेण्यात येणार असून निवडणुकीत चुर्शिची लढत होणार यात काही शंकाच नाही...

अविश्वास ठरावाच्या राजकीय संघर्षामुळे किशोर काजारेंची राजकीय ताकद व चिकाटी जिल्ह्यात खऱ्या अर्थाने चर्चेत 

किशोर काजारे हे मुरुड तालुक्यातील वळके ग्रामपंचायतीचे स्मार्ट ग्राम पुरस्कार विजेते सरपंच आहेत...त्यांच्या प्रथम ग्रामपंचायत कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून झाली होती, सरपंच म्हणून कार्यरत असताना त्यांच्या ९ सदस्यांनी अविश्वास टाकला मात्र पूर्ण जनतेतून पुन्हा मतदान होऊन किशोर काजारे हे दुसऱ्यांदा सरपंच पदी विराजमान झाले...त्यावेळी ते अपक्ष लढले आणि विजयी झाले...थेट सरपंचावर आलेले हा महाराष्ट्रातील पहिला अविश्वास ठराव होता त्यामुळे या अविश्वास ठरावाच्या राजकीय संघर्षामुळेच किशोर काजारे यांची राजकीय ताकद आणि चिकाटी जिल्ह्यात खऱ्या अर्थाने चर्चेत आली...

वकृत्वाची तोफ किशोर काजारेंची शिवसेना पक्षात घरवापसी विरोधकांच्या मनात धडकी भरवणारी ठरणार तालुक्यात चर्चा 

महाराष्ट्रात जाहीर झालेल्या सर्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकांच्या ऐन मौक्यावर काजारे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांच्या विचारांवर प्रभावित होऊन, रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे आणि उपजिल्हाप्रमुख प्रशांत मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली  दि.१० रोजी मुरुड तालुक्यातील शेकडो  कार्यकर्त्यांच्या समवेत मातोश्री येथे पक्षप्रमुख उध्दव साहेबांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला...मुरुड तालुक्यात  वकृत्वाच्या बाबतीत तोफ समजले जाणारे किशोर काजारे यांची शिवसेना पक्षात झालेली ही घरवापसी विरोधकांच्या मनात धडकी भरवणारी ठरणार अशी चर्चा सर्वत्र तालुक्यात होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post