कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे ) :
रात्री दिवसा केव्हाही ही गुरं रस्त्यावर ठिय्या मांडत असल्यामुळे वाढली मोठी डोकेदुखी
राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य मार्ग त्याच बरोबर ग्रामीण तसेच शहरी भागांतील महत्त्वाच्या रहदारीच्या मार्गावर नेहमीच अनेक मोकाट गुरांचा ठिय्या विश्रांती घेत अथवा उभे किंवा बसलेल्या अवस्थेत असतात...रात्री दिवसा केव्हाही ही गुरं रस्त्यावर ठिय्या मांडत असल्यामुळे किंवा भर रस्त्यात चालत असल्याने दुचाकी, चारचाकी वाहनं तसेच जडअवजड वाहन चालकांची यांना वाचविणेकरता मोठी डोकेदुखी तर काही जागेवर तारेवरची कसरत करावी लागत आहे...
उन्नाड जनावरे दररोज मोकाट भटक्या गुरांनी तर काही ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी मांडला उच्छाद
कोलाड रोहा राज्य मार्गावर मोकाट जनावरांचा दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात त्रास वाढत आहे... ही उन्नाड जनावरे तसेच दररोज मोकाट भटक्या गुरांनी तर काही ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असल्याने मार्गावर ये जा करणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण होत असुन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते...त्यामुळे नागरीक देखील कमालीचे त्रस्त झाले आहेत...तर रात्रीच्या सुमारास अंधार तसेच मागील चार दिवस मोठा पाऊस असल्याने वाहन चालकांना गाडी चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे...
मोठ्या प्रमाणात वाहन वाहतूकदार, प्रवाशी वर्गात निर्माण झालाय अडथळा...बंदोबस्त करणार कोण? हा मोठा प्रश्न
रोहा कोलाड महामार्गावर बाय पास तसेच वरसे, रोठ ,या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा संचार तर एक्सल,जैन वाडी, धाटाव,सुदर्शन, बारसोली,किल्ला, अशोक नगर स्टॉप,वर तसेच सदरच्या मार्गावर भटक्या जनावरांच्या व गुरांचा मोठया प्रमाणात जणू ठिय्या मांडून बसलेले वारंवार आढळून येतात.. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहन वाहतूकदार तसेच प्रवाशी वर्गाला मोठा अडथळा निर्माण होत आहे...त्यात गुरांचे मालक असुन नसल्यासारखे तर त्यात अपघातात एखादा गुर दगावला तर तात्काळ सारे मालक एकच ठिकाणी गोळा होतात...मात्र आपल्या मालकीची गुर आहेत...याचा मात्र विसर पडतो त्यामुळे या मोकाट गुरांचा बंदबस्त कोण करणार? हाच प्रश्न साऱ्यांना पडला आहे...
मुबंई, गोवा या राष्ट्रीय महामार्गाला जोडला गेलेला कोलाड रोहा राज्य मार्गावर रोहा, मुरुड, अलिबाग, दिवेअगार, मुंबई, ठाणे शहरांकडे जाण्यासाठी हजारो लहान-मोठी वाहन रात्रं-दिवस ये-जा करत असतात...तर धाटाव या परिसरामध्ये औदयोगिक वसाहत व अनेक कंपन्या सुरू झाल्या असल्यामुळे कंपनीसाठी लागणारा कच्चामाल नेण्यासाठी जडअवजड वाहन सुद्धा मोठ्या संख्येने या मार्गावरून धावत असतात...तर रोहा ही सर्वांचीच मेन बाजारपेठ असल्याने अनेकजण रोहाकडे प्रवास करतात...मात्र या सर्वांना सदरच्या मार्गावर ही मोकाट गुरे ठिय्या मांडून असलेल्या गुरांचा वाहन चालकांना मोठा त्रास होत असून मोठा अपघातांचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही...
वाहनाच्या धडकेत जनावरांचा मृत्यू...जनावर मालकांचेही नुकसान...उपाय योजना करण्याची मागणी
मुबंई गोवा महामार्ग रोहा कोलाड मार्ग कोलाड भिरा मार्ग आशा मार्गांवर अनेकवेळा वाहनाच्या धडकेत किंमती जनावरे मृत्यूही पावलेली आहेत...त्यामुळे मोकाट सोडलेल्या व मृत्यू पावलेल्या जनावरांच्या मालकाचे खूपच नुकसान होत असते...काहींची दुध दुभती जनावरं तसेच शेतीच्या कामासाठी त्याचप्रमाणे बैलगाडी साठी बैलांचा उपयोग होत असतो...त्यामुळे अशी दूध दुपती गाय, बैल जनावरं मोकाट सोडणं चुकीचे आहे...त्यांच्या सोबत कोणीतरी मालक किंवा गवारी असणे आवश्यक आहे... जेणेकरून ही जनावरं रस्त्यावर येणार नाहीत...त्यांचा अपघात होणार नाही...आणि शेतकऱ्यांचे नुकसानसुध्दा होणार नाही... शिवाय वाहन चालकांनादेखील या गोष्टीचा अडथळा निर्माण होणार नाही...यासाठी संबधित परिसरातील ग्रामपंचायत अथवा ग्रामस्थांनी यावर उपाय योजना कराव्या...अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे...


