महाराष्ट्र वेदभुमी

कोलाड तळवली एक ऑक्टोबर रोजी लोकसहभागातून स्वच्छता अभियान .



कोलाड प्रतिनिधी(श्याम लोखंडे) 

कोलाड येथील तळवलीतर्फे दिवाळी येथे स्वच्छता मोहीम  ग्रामस्थ नागरिक तसेच महिलांनी घेतला सहभाग

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत स्वच्छता हीच सेवा हे अभियान राबविण्यात येणार आहे...प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोबर पर्यंत हे अभियान राबविण्याचे आवाहन केले आहे...यामध्ये स्वयंसेवी संस्था, अधिकारी ,कर्मचारी , एन एस एस , एन सी सी, बचत गटांच्या सदस्य ,अंगणवाडी सेविका , आशा सेविका,विद्यार्थी यासह लोकसहभागातून ही मोहीम तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार कोलाड येथील तळवली तर्फे दिवाळी येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली याला ग्रामस्थ नागरिक तसेच महिलांनी मोठा सहभाग घेतला...


१ ऑक्टो रोजी सकाळी १० ते ११ एक तास सामुदायिक केली स्वच्छता

रोहा तालुक्यात स्वच्छता अभियान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहननुसार सद्गुरु हरीश्चंद़ महाराज प्रणित हरि ॐ सेवा संस्था खारपाले यांच्या अधिपत्याखालील श्रीगणेश सत्संग मंडळ तळवली तर्फे दिवाळी येथील साधकांनी तळवली गावाच्या प्रथमदर्शनी पडलेला घनकचरा,गवत,दगड गोटे,याची स्वच्छ्ता १ ऑक्टोबर रोजी सकाळी  १० ते ११ एक तास सामुदायिक स्वच्छता केली...

देशाचे पंतप्रधान तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी स्वच्छ्ता अभियान राबवण्याचे केले आवाहन 

देशाचे पंतप्रधान तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी १ ऑक्टोबर रोजी एक तास स्वच्छ्ता अभियान राबवण्याचे आवाहन केले आहे...या आवाहनाला प्रतिसाद देत गावातील तसेच परिसरातील स्वच्छता स्थानीक पातळीवर केलेली स्वच्छतेची सेवा ही सद्गुरु हरिश्चंद़ महाराज तथा अप्पांच्या चरणी समर्पित असल्याचे सेवक नंदु महाराज तेलंगे तळवली रोहा यांनी सांगीतले..

Post a Comment

Previous Post Next Post