महाराष्ट्र वेदभुमी

५ ऑक्टोरपर्यंत E-KYC न केल्यास पीएम किसान योजनेचा लाभ नाही, रोहा कृषी विभागाकडून विशेष मोहीम


कोलाड प्रतिनिधी ( श्याम लोखंडे)

आत्तापर्यंत १४ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा.. सद्या शेतकरी पाहात आहेत १५ वा हप्ता  जमा होण्याची वाट

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते... आत्तापर्यंत १४ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत... तर सध्या शेतकरी १५ वा हप्ता कधी जमा होणार याची वाट पाहत आहेत...परंतु पात्र लाभाथ्यांचे ई केवायसी प्रमाणिकरण, बँक खाते आधार सलग्न करणे व भुमिअभिलेख नोंदी अदयावत करणे या बाबी केंद्र शासनाने अनिवार्य केल्या आहेत...शासनाच्या सुचनेनुसार लाभार्थ्यांनी गुरुवार दि.५ ऑक्टबरपर्यंत  ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करणार नाहीत तसेच बँक खाते आधार संलग्न करणार नाही त्यांची नावे पीएम किसान योजनेतुन वगळण्यात येणार असल्याचे रोहा तालुका कृषी अधिकारी तसेच त्यांच्या कार्यालयातून यासंदर्भात प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे...तर यासाठी तालुका स्तरावर विशेष मोहीम विभागाकडून राबवली जात आहे...

E-Kyc अपडेट होत नसल्याचे निदर्शनास दि.५ ऑक्टोबर E-kyc व आधारकार्ड अपडेट करण्याची शेवटची मुदत.. 

रोहा तालुक्यातील ९०३७ शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत तर ५८३ लाभार्थीची ई -केवायसी तर १३११ लाभार्थीची आधार सिडिंग प्रलंबित असल्याचे म्हटले आहे. मागील अनेक महिन्यापासून ते आजपर्यंत या संदर्भात गावस्तरावर लाभार्थी यांना तसेच शेतकऱ्यांना विभागीय कृषि अधिकारी वर्गांकडून वारंवार आवाहन करूनही केवायसी अपडेट होत नसल्याचे निदर्शनास आले आहे तर अधिक शेवटी ची गुरुवारी दि.५ ऑक्टोबर ही केवायसी व आधार अपडेट करण्याची शेवटची मुदत आहे. त्यानंतर प्रधानमंत्री किसान योजनेच्या पोर्टलवरून लाभार्थी सूचीतून अशा या लाभार्थ्यांची नावे वगळली जातील व योजनेच्या लाभापासून वंचित राहण्यास संबंधित खातेदार शेतकरी हे स्वतः जबाबदार राहतील अशी माहिती तालुका कृषिधिकरी महादेव करे यांनी लाभार्थी शेतकऱ्यांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे तसेच ती लवरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे...

स्वतःचे बँक खाते आधार सलग्न करणे या बाबींचा वापर करुन पी एम किसान योजनेचा घेता येईल लाभ 

ई केवायसी अपडेट करण्याकरीता मोबाईल फोनवरुन ओटीपी बेस, सामाईक सुविधा केंद्र मार्फत व मोबाईल फोन वरुन पी एम किसान गुगलॲपव्दारे चेहरा पडताळणी, प्रमाणिकरण ( हे तीन पर्याय आहे... बँक खाते आधार सलग्न करण्याकरीता इंडीया  पोस्ट पेमेंट बँक खाते उघडणे, स्वताचे बँक खाते आधार सलग्न करणे या बाबींचा वापर करुन पी एम किसान योजनेचा लाभ घेता येईल...केवायसी प्रलंबित लाभार्थ्याची नावे ग्रामपंचायत,संबंधित गावचे कृषि सहाय्यक यांचेकडे उपलब्ध आहे...शेतकऱ्यांना ई-केवायसी व बँक खाते आधार सलग्न करण्यासाठी काही अडचण असल्यास आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कृषि अधिकारी तसेच सहाय्यक अधिकारी यांनी केले आहे...

५ऑक्टो पर्यंतe-kyc व बैंक खाते आधार सलग्निकरण न केल्यास शेतकऱ्यांची नावे रद्द करून कार्यवाही केली जाईल 

पी. एम किसान योजने अंतर्गत ई-केवायसी व बैंक खाते आधार सलग्निकरण हे शेवटी येत्या ५ ऑक्टो पर्यंत करण्यात यावे....अन्यथा या योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांची नावे रद्द करण्याची कार्यवाही शासन स्तरावरून केली जाईल... याची सर्व शेतकरी बंधूंनी नोंद घ्यावी...तसेच या योजनेपासून कोणीही लाभार्थी शेतकरी वंचित राहू नये यासाठी येत्या ५ ऑक्टबरपर्यंत पीएम किसान योजनेचे केवायसी करण्याचे आवाहन  रोहा तालुका कृषि - अधिकारी महादेव करे यांनी केले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post