महाराष्ट्र वेदभुमी

नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने लढाऊ कामगार नेते सुरेश पाटील यांचा सत्कार.



उरण दि २७ प्रतिनिधी (विठ्ठल ममताबादे)

कामगार नेते सुरेश पाटील यांचा यावेळी आ.गणेश नाईक यांच्या हस्ते सत्कार 

'नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'चा ५ वा वर्धापन दिन वाशीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला... यावेळी 'संस्था'च्या वतीने घेण्यात आलेल्या 'लोकनेते दि. बा. पाटील ऊर्जास्थान' या चळवळ स्पर्धेच्या माध्यमातून 'दिबां'चे कार्य साहित्य आणि कला स्वरुपात सादर केलेल्या गुणवंतांचा गुणगौरव सन्मान आमदार गणेश नाईक, 'दि. बा. पाटील नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती'चे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी खासदार संजीव नाईक, 'दिबां'चे सुपुत्र अतुल पाटील, आयोजक दशरथ भगत, आदिंच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला...यावेळी लोकनेते दिबा पाटील यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या अनेक आंदोलनात सहभाग घेतलेल्या व ७ दिवस नाशिक कारागृहात तुरुंगवास भोगलेले उरण जासईचे सुपुत्र, कामगार नेते सुरेश पाटील यांचा यावेळी आ.गणेश नाईक यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला...

सर्व कामाची दखल घेउन सुरेश पाटील यांचा विशेष सन्मान 

सुरेश पाटील यांनी लोकनेते दिबा पाटील यांच्या आंदोलनात भाग घेतला होता. समाजकार्य करत करत गोर गरिबांची सेवा केली...स्थानिक भूमीपुत्रांमध्ये रोजगार, नोकरी व इतर महत्वाच्या विषयावर जनजागृती केली... लोकांना एकत्र केले... सध्या ते भारतीय मजदूर संघांचे रायगड जिल्हाध्यक्ष आहेत... त्यांच्या आजपर्यंतच्या सर्व कामाची दखल घेउन सुरेश पाटील यांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या उपस्थितीत केला गेला...

या सोहळ्यास माजी आमदार तथा 'भाजपा'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, अर्जुनबुवा चौधरी, जेष्ठ पत्रकार विश्वरथ नायर, 'अखिल भारतीय लेवा पाटीदार समाज'चे विश्वस्त महादेव वावीया, कामगार नेते भूषण पाटील, 'लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ नामकरण समिती'चे संतोष केणे, विनोद म्हात्रे, 'शेतकरी प्रबोधिनी'चे अध्यक्ष राजाराम पाटील, ऍड . अजित येरुणकर, गायक जगदीश पाटील, डॉ. आर. एन. पाटील, 'केबीपी कॉलेज'च्या प्राचार्य शुभदा नायक, डॉ. पी. जी. पवार, अरुण घाग, एम. जी. म्हात्रे, सुजाता बल्लाळ, बी. बी. साळुंखे, नाथा नाईक, सूरदार राऊत, सुभाष ठाकूर, कारंडे सर, आदि मान्यवर उपस्थित होते.तर 'दि. बा. पाटील चळवळ स्पर्धा संयोजन समिती'तील रविंद्र वाडकर, प्रशांत निगडे, किशोर पाटील, प्रवक्ते शैलेश घाग, डॉ. विवेक भोईर, सुधाकर लाड, गजआनन म्हात्रे, रामनाथ म्हात्रे, तेजस पाटील, 'पुनर्वसन संस्था'चे पदाधिकारी संजय यादव, देवेंद्र खाडे, फशीबाई भगत, वैजयंती भगत, संदीप भगत, रामेश्वरद्याल शर्मा, आदि योळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post