महाराष्ट्र वेदभुमी

रोहा अष्टमी चर्मकार समाजाच्या अध्यक्षपदी कमलाकर रोहेकर,सरचिटणीसपदी रुपेश नांदगावकर



रोहा, दि. २७ ऑक्टो -प्रतिनिधी ;- 

रुपेश नांदगावकर यांची सर्वानुमते निवड 

रोहा अष्टमी संत रोहिदास समाज विकास मंडळाच्या अध्यक्षपदी कमलाकर रोहेकर तर  सरचिटणीसपदी रुपेश नांदगावकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली... संत रोहिदास सभागृह, महात्मा फुले नगर रोहा येथे नुकतेच संपन्न झालेल्या समाजाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली... 

बैठकीमध्ये ज्येष्ठ सभासदांनी मार्गदर्शन केले मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित

रोहा अष्टमी संत रोहिदास समाज विकास मंडळाची जनरल सभा महात्मा फुले नगर रोहा येथे नुकतीच संपन्न झाली, यासभेत सन २०२३ ते  २०२५ करिता नविन कार्यकारणीची निवड करण्यात आली, त्यामध्ये अध्यक्षपदी कमलाकर रोहेकर, उपाध्यक्ष सुनील गेनू भोईरकर, कार्याध्यक्ष अजिंक्य रोहेकर, सचिव रूपेश नांदगावकर, खजिनदार दर्शन कदम, सहसचिव रवींद्र  पेणकर, सहखजिनदार विवेक रोहेकर, सल्लागार गजानन रोहेकर, श्रीकांत मुरुडकर, शरद कोटकर, भगवान पेणकर, कार्यकारिणी सदस्यांमध्ये किशोर रोहेकर, नथुराम देवजी रोहेकर, सुरेश रोहेकर आदींचा समावेश करण्यात आला आहे...बैठकीत नियमित कामकाजासह आयत्या वेळीच्या विषयांवर विचारविनिमय झाले. बैठकीमध्ये ज्येष्ठ सभासदांनी मार्गदर्शन केले तर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते... जिल्हा व तालुका समाजाकडून नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post