महाराष्ट्र वेदभुमी

आयुष्यमान भारत चे कार्ड असेल तर मिळेल ५ लाखापर्यंत मोफत उपचार


माणगाव प्रतिनिधी (सिकंदर आंबोणकर)

लाभार्थ्यांना ई-कार्ड देण्याचं काम नागरी सुविधा केंद्रांवर झाले सुरू

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा अंतर्भाव करून आयुष्यमान भारत योजना राबविली जात असून,या योजनेअंतर्गत रुग्णांना ५ लाख रुपयापर्यंत उपचार मोफत दिले जाणार आहेत...जिल्ह्यात या योजनेचा प्रारंभ झाला आहे...

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत दीड लाख तर प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत साडेतीन लाखापर्यंत उपचार 

पिवळया व केशरी रेशनकार्ड धारकांना या योजनेचा लाभ घेऊ शकतात लाभार्थ्यांना ई-कार्ड देण्याचं काम नागरी सुविधा केंद्रा वर चालू झाले आहे.कुटुंबाचे ई-कार्ड बनवून घेऊन योजनेचा घेऊ शकतात...महात्मा फुले जनआरोग्य योजनेत दीड लाखापर्यंत तर प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत साडेतीन लाखापर्यंत असे पाच ५ रुपयांचे उपचार मोफत मिळतात...त्यामुळे आपण लवकरात लवकर सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबातील सर्वांचे आयुष्यमान भारत कार्ड समर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्था तसेच माऊली कम्प्युटर्स लोणेरे माणगाव,जि.रायगड मो.न.८९८३८२११३७ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने CSC पोर्टल वर लवकरात लवकर नोंदवून घ्यावे...असे जिल्हा प्रशासनाकडुन कळविण्यात आले आहे..



Post a Comment

Previous Post Next Post