रोहा / शहानवाज मुकादम
गणेशोत्सवाची तयारी जोमाने सुरू बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड गर्दी..वाहतूक कोंडीचा फटका
तालुक्यात सद्या सर्वत्र गणेशोत्सवाची तयारी जोमाने सुरू असून मंगळवार पासून उत्सवाला सुरुवात होणार आहे... त्यासाठी बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली असून त्यातच गणेशमूर्ती ही घरी नेण्यासाठी भक्त बाजारात आले आहेत...याच गर्दीत दुचाकी चारचाकीने रोहा बाजारपेठेत वाहतूक कोंडीचा फटका बसू लागला आहे...
दिवसागणिक वाढणारे फेरीवाले आणि वाढती वाहनांची संख्या यांची भर
उत्सवात होणाऱ्या वाहतूक कोंडीचे नियोजन करण्याची जबाबदारी रोहा नगरपरिषद व वाहतूक विभागाची असतानाही ती दिसत नसल्याने कोंडीत अधिकची भर पडली आहे...रोहा शहरातील रस्ते हे अरुंद असुन या शहरात वाहनतळाचा अभाव आहे...त्याचप्रमाणे दिवसागणिक वाढणारे फेरीवाले आणि वाढती वाहनांची संख्या यांचीही भर पडली आहे...दुसरीकडे वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारी बेशिस्त वाहन पार्किंग या वाहनांवर न होणारी कारवाई या सर्व समस्यांमुळे कोंडीत अधिकची वाढ झाली आहे...त्यामुळे रोहा नगरपरिषद व वाहतूक विभागाने संयुक्तरित्या मोहीम राबवून किमान उत्सवाच्या काळात तरी शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे...

