महाराष्ट्र वेदभुमी

रोहा धाटाव किल्ला आशोक नगर येथे विश्वकर्मा जयंती .



कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे) : 

पृथ्वी,जल व सर्व प्राणी मात्रांचा निर्माता शिल्पी व वास्तूरचनेचा निर्माता भगवान विश्वकर्माचा उल्लेख

पृथ्वी,जल व सर्व प्राणी मात्रांचा निर्माता आजवर उत्कृष्ट शिल्पी व वास्तूरचनेचा निर्माता म्हणून भगवान विश्वकर्माचा संस्कृत पोती पुराणात व महाभारतात उल्लेख देखील आहे लोहार, सोनार, कुंभार, सुतार इत्यादींना विश्वकर्माचे वंशज मानले जातात या अनुषंगाने १७ सप्टें हा दिवस देशात तसेच विविध राज्यात मेस्त्री कारागीर तसेच विविध कलाकृती करणारे व हात मजूर यांच्यावतीने प्रख्यात शिल्पी भगवान विश्वकर्मा जयंती विश्वकर्मा मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करून त्याचे पूजन करून मोठया आनंदाने साजरा करतात याचे औचित्त साधून रोहा तालुक्यातील रोहा, दमखाडी, धाटाव तसेच मौजे किल्ला अशोक नगर येथे सुदीप कन्स्ट्रॅकशन यांचे मालक परेश देवनाथ या परिवाराच्यावतीने गेली सत्तावीस वर्ष हा उत्सव सुदीप कन्स्ट्रक्शन व त्यांचे सर्व कारागीर मजूर कामगार वर्ग यांच्या सहकार्याने मोठ्या आनंदाने साजरा करतात...

विश्वकर्मा मूर्तीची स्थापना आदिस्थानाची महापूजा कारागीरांचे काम करण्याचे साधन तसेच साहित्यपूजन केले जाते...

या कार्यक्रमाची सुरवात सालाबादप्रमाणे १७ सप्टेंबर या दिवशी केली जाते माञ या दिवशी मूर्तीची प्रतिष्ठापना ही पूजा वेळ दुपारनंतर असल्याने सोमवारी १८ सप्टेंबर रोजी सकाळी विधिवत पद्धतीने ठीक ९ वा कलश पूजन विश्वकर्मा मूर्तीची स्थापना व आदिस्थानाची महत्वपूर्ण महापूजा केली जाते... तसेच या कारागीरांचे काम करण्याचे साधन तसेच साहित्य पूजन देखील याक्षणी करण्यात येते...यावेळी धाटाव औद्योगिक क्षेत्रातील विविध मान्यवर उद्योजक तसेच विविध कारागीर कर्मचारी वर्ग या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवितात... तसेच देवनाथ परिवाराला यानिमित्ताने शुभेच्छा देत विश्वकर्मा अधिष्ठान मूर्तीचे दर्शन घेतले...

धाटाव दमखाडीसह रोहा शहरात तसेच विविध ठिकाणी जयंती मोठया उत्साहवात केली जाते साजरी

परेश देवनाथ यांच्या परिवाराच्यावतीने सालाहबादप्रमाणे दरवर्षीप्रमाणे १८ सप्टें व २० सप्टें रोजी भगवान विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते...किल्ला धाटाव दमखाडीसह रोहा शहरात तसेच विविध ठिकाणी हि जयंती मोठया उत्साह वातावरणात साजरी केली जाते...राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश , आंध्र प्रदेश, गुजरात, कलकत्ता, येथील कलाकुसर करणारा तांत्रिक कामगार (मिस्त्री) काम करणारे वर्ग विश्वकर्मा पूजा करतात...अभियांत्रिकी स्थापत्यशास्त्र यामधील अभियंते कामगार वर्कशॉप कारागीर यांच्यामध्ये या दैवताचे महत्वाचे स्थान मोठ्या श्रद्धेने पूजा करतात...

भगवान विश्वकर्मा मूर्तीची स्थापना,पाद्यपूजन,अभिषेक, महाआरती,भजन,धार्मिक कार्यक्रम करून उत्सव साजरा

सोमवारी १८ सप्टेंबर या दिवशी भगवान विश्वकर्मा यांच्या मूर्तीची स्थापना पाद्य पूजन अभिषेक महाआरती भजन असे धार्मिक कार्यक्रम तद्नंतर महाप्रसाद व समारोपाला मूर्तीची मिरवणूकिच्या माध्यमातून भावपूर्ण निरोप देत मंगळवारी मूर्ती विसर्जन करता येत नसल्याने बुधवारी नदीपात्रात विसर्जन करून हा उत्सव आनंदाने साजरा करण्यात येत असल्याचे परेश देवणाथ यांनी सांगीतले...

Post a Comment

Previous Post Next Post