पुगाव - खांब प्रतिनिधी:(नंदकुमार कळमकर )
गणेशउत्सवानिमित्ताने मान्यवरांच्या शुभहस्ते अंगणवाडी ते पदवीधर विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप
रोहा तालुक्यातील श्री. क्षेत्रपाळ मित्रमंडळ पुई यांनी गेली १६ वर्षांपासून सुरु करण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशउत्सवा निमित्ताने विविध उपक्रम राबविले जात असुन यानिमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभहस्ते अंगणवाडी ते पदवीधर विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले... यावेळी कोलाड पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक अजित साबळे, त्यांचे सहकारी नरेश पाटील, भाजपचे रोहा तालुका अध्यक्ष महेश ठाकूर,सामाजिक कार्यकर्ते रविंद्र तारू, ह.भ.प.आंबेकर महाराज, सार्वजनिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनंत सानप, दत्ताराम भंनगे व मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते...
सहापोलिस निरीक्षक अजित साबळे यांनी पुई गावातील तरुणांना केले मार्गदर्शन
यावेळी मार्गदर्शन करतांना सहापोलिस निरीक्षक अजित साबळे यांनी सांगितले कि मला पुई गावातील तरुण मंडळाच्या तरुणांनी मला येथे येण्याची संधी दिलीत व माझा सत्कार केलात याबद्दल मी आभार मानतो...सजावट कोणी किती चांगली केली यापेक्षा तुम्ही किती उत्सहात भाग घेता हे महत्वाचे आहे...सार्वजनिक उत्सवामुळे संस्कृती जपली जाते...माझा संबंध शेतीशी येतो परंतु आमच्या गावातील या क्षेत्रातील लोकांकडे बघत मी मोठा झालो यांच्याप्रमाणे मी या क्षेत्रात काम करावे ही भावना निर्माण झाली व काम करण्याची संधी मिळाली माझ्या प्रमाणेच या गावातील एखादा विद्यार्थी पोलिस ऑफिसर झाला तर मी येथे आल्याचे सार्थक ठरेल...
१६ वर्षांपासून कोलाड विभाग मंडळातर्फे विविध उपक्रम राबवितात..ऐकी टिकून गरजेचे ता अध्यक्ष महेश ठाकूर
तसेच तालुका अध्यक्ष महेश ठाकूर यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि गेली १६ वर्षांपासून कोलाड विभागात या मंडळातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत... त्यांची ऐकी अशीच टिकून राहणे गरजेचे आहे...तसेच श्रवण कदम यांनी सांगितले कि कोणताही ही निर्णय घेतांना तो निर्णय ठाम असला पाहिजे जर एखाद्याला डॉक्टर व्हायचा आहे तर त्यांनी दुसरा विचार करुन उपयोग नाही...तरच जीवनात यशस्वी होईल...तसेच डॉ. सागर सानप यांनी सांगितले कि आपल्याला ज्या गोष्टी जमत नाही...तर दुसऱ्याचा सल्ला घ्या.. बुद्धीमत्तेला जगामध्ये फार महत्व आहे...त्यामुळे मुंबईच्या कोणत्याही कॉलेजला ऍडमिशन पाहिजे असेल तर माझी मदत घ्या..तेथे काम नाही झाले तर मी तुम्हाला दुसरा मार्ग सांगेन तर रविंद्र कदम यांनी मोबाईल विद्यार्थ्यानी कशासाठी वापरावे याचा सल्ला दिला...
असंख्य ग्रामस्थ तसेच असंख्य विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित
यावेळी संस्थापक अनंत सानप,अध्यक्ष विठ्ठल पवार,उपाध्यक्ष सचिन लहाने,सचिव हरिचंद्र कदम,उत्सव कमेटी,अध्यक्ष रोहन पवार,उपाध्यक्ष हेमंत महाडीक,सचिव चैतन्य कदम,सभासद दिनकर सानप,संदिप शिर्के,मंगेश सानप लक्ष्मण पवार,अनिकेत शिर्के,सागर सानप श्रवण कदम ग्रामपंचायत सदस्य अजीत लहाने,विठोबा सानप,समीर पडवल,गोपाल खामकर,प्रकाश दिसले,उदय कदम, सिताराम आंबेकर,सचीन दिसले,विश्वास लहाने उदय खामकर,हरिचंद्र खामकर,व असंख्य ग्रामस्थ तसेच असंख्य विद्यार्थी उपस्थित होते..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सागर सानप यांनी केले...तर उपस्थितांचे आभार श्रवण कदम यांनी मानले..