महाराष्ट्र वेदभुमी

रोहयातील ऐनघर ग्रामपंचायतीत अपहार सरपंच, सदस्य फरार,सहा आरोपींचा न्यायालयाने फेटाळला जामीन


रोहा, दि.२६ विशेष वार्ताहर) 

ऐनघर ग्रामपंचायत अपहार झाल्याप्रकरणी १७ सदस्यांवर नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

रोहा तालुक्यातील  ऐनघर गावात विकासकामे न करताच कोट्यवधींचा निधी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने लाटल्याचा प्रकार समोर आला आहे...तालुक्यातील ऐनघर ग्रामपंचायतीतील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी दिपक दाजी चिपळूणकर, ग्रामविकास अधिकारी मेश्राम आणि तत्कालीन प्रभारी सरपंच दिनेश जाधव यांच्यासह १७ सदस्यांवर नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला... 

सहा सदस्यांनी माणगाव जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केला अर्ज

असून यातील सहा सदस्यांनी माणगाव जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता...मात्र गुन्हा गंभीर असल्याने न्यायालयाने सर्वांचा अर्ज फेटाळून लावला...जामीन फेटाळताच हातात कधीही बेड्या पडण्याच्या भीतीने आरोपी फरार झाले आहेत...रोहा तालुक्यातील श्रीमंत समजली जाणारी ऐनघर ग्रामपंचायतीमध्ये भाजप आणि शिंदे गटाची सत्ता आहे..

अपहाराची माहिती मा.सरपंच महादेव मोहीतेंना माहिती अधिकारात समजताच आ.कोकण भवनात केली होती तक्रार

ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याची माहिती माजी सरपंच महादेव मोहिते यांना माहिती अधिकारात समजली... त्यानुसार त्यांनी १४ जानेवारी २०२० रोजी विभागीय आयुक्त कोकण भवन येथे अपहाराची तक्रार केली... रोहा पंचायत समिती विस्तार अधिकारी जी. एल. वायल यांनी केलेल्या चौकशी अहवालात मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे आढळून आले...परंतु अपहार करणाऱ्यांवर राजकीय वरदहस्त असल्याने कारवाई होत नव्हती...त्यामुळे महादेव मोहिते यांच्यासह येथिल स्थानीक बेरोजगार संघटनेचे पदाधिकारी आणि ऐनघर ग्रामस्थांनी २२ मार्च २०२० रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण केले होते...

राज्यात 'ईडी' सरकार सत्तेत असल्याने कारवाई होत नसल्याने रखडली गेली

सदरच्या उपोषणाची दखल घेऊन तत्कालीन चौकशी अधिकारी जी.एल. वायल व रोहा गटविकास अधिकारी यांनी ऐनघर ग्रामपंचायतीत १ कोटी २५ लाखांचा अपहार झाल्याचा अहवाल रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवला होता...मात्र राज्यात 'ईडी' सरकार सत्तेत असल्याने कारवाई होत नसल्याने ती रखडली गेली होती... त्यानंतर पुन्हा एकदा महादेव मोहिते यांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली...न्यायमूर्ती ए. एस.गडकरी व शर्मिला यू. देशमुख यांनी या प्रकरणाचा सविस्तर अहवाल न्यायालयात सादर करण्याचा आदेश दिला होता...

उच्च न्यायालय आदेशावरून तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व इतर दोषींचा जामीन जिल्हा न्यायालयात फेटाळला 

तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी या सर्व दोषींवर नागोठणे पोलीस ठाण्यात १७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला...तत्कालीन ग्रामविकास अधिकारी दीपक चिपळूणकर, ग्रामविकास अधिकारी मेश्राम, तत्कालीन प्रभारी सरपंच दिनेश जाधव, ग्रामपंचायत सदस्या शिलावती गायकवाड, आदिती जंगम, प्रणाली रेडकर या सहाजणांचा जामीन जिल्हा न्यायालयात फेटाळला असल्याचे समोर आले...


असा केला अपहार-

अंदाजपत्रक, मूल्यांकनाशिवाय, दरपत्रकाशिवाय व ई- निविदाशिवाय खोट्या योजना राबवल्याचे दाखवले...

तालुक्यातील ऐनघर गावात लोकविकासाची कामे न करता सत्ताधाऱ्यांनी सर्व पैसे आपल्या खिशात घातले...त्यात ग्राम पंचायत मध्ये काम करणाऱ्या ग्राम विकास अधिकारी यांचा ही समावेश तर अंदाजपत्रक, मूल्यांकनाशिवाय, दरपत्रकाशिवाय व ई- निविदाशिवाय खोट्या योजना राबवल्याचे दाखवले... प्रत्यक्षात मात्र एकही विकासकाम सदरच्या गावात झाले नसल्याचे तक्रारदार यांना मिळालेल्या माहिती अधिकारात हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर मिंध्यांच्या खाबुगिरीविरोधात ग्रामस्थांनी आवाज उठवला असून अधिक कारवाही व्हावी अशी मागणी केली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post