महाराष्ट्र वेदभुमी

मुंबई गोवा महामार्गावर कोलाड नाक्यावर पत्रकारांचा आरती जागर आंदोलन...करणार शक्ती तुरा नाचाचा सामना..


निकृष्ठ दर्जाच्या कामाबाबत निषेध..कोलाड आंबेवाडी नाक्यावर चौकात शक्ती तुरा 

कोलाड (श्याम लोखंडे ) मुंबई - गोवा महामार्गासाठी रायगडमधील पत्रकार ९ऑगस्टच्या बोंबाबोंब आंदोलनानंतर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत आहेत...१२ सप्टेंबर २३ रोजी कोलाड नाका येथे नेहमीप्रमाणे शांततेच्या मार्गाने आरती जागर आंदोलन होत असून यात गेली सतरा वर्ष रखडलेल्या या मार्गाच्या निकृष्ठ दर्जाच्या कामाबाबत निषेध करत कोलाड आंबेवाडी नाक्यावरील चौकात शक्ती तुरा जंगी नाच सदरच्या आंदोलनात होणार आहे...मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त  एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन होणार आहे...

रस्त्यावरील खड्डे भरले नाही तर गणेश भक्तांनी प्रवास करायचा कसा? 

 ९ऑगस्ट रोजी पत्रकारांनी वाकण नाका येथे बोंबाबोंब आंदोलन केलं असताना बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी १०सप्टेंबर पर्यत रस्त्यावरील खड्डे भरण्याचे आणि एक लेन पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते... मात्र कामाचा वेग लक्षात घेता हे काम गणपतीपुर्वी पूर्ण होत नाही... खड्डे भरण्याचे काम ज्या एजन्सीला दिले गेले होते ती एजन्सी बदलली जात आहे... तर जी मशिनरी सिमेंटचे काम करीत होती ती नादुरूस्त झाल्यानं रस्त्याचं काम निर्धारित वेळेत पूर्ण होणं शक्य नाही असं चित्र दिसतंय...रस्त्यावरील खड्डे भरले गेले नाही तर गणेश भक्तांना प्रवास करणं शक्य होणार नाही... पेण - इंदापूर, लोणेरे - दासगाव या दरम्यान गाडी चालविणे अशक्य झालेले आहे... असे असतानाही सरकार गांभीर्याने या विषयाकडे का पहात नाही? 


आंदोलनात पत्रकार आणि जनतेनं सहभागी व्हावं... रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांचे आवाहन 

याचा निषेध करण्यासाठी १२ सप्टेंबर रोजी आरती जागर आणि खड्डयावरील गाण्याचा कलगीतुरा मुकाबला खड्ड्यात बसून केला जाणार आहे...या आंदोलनात पत्रकार आणि जनतेनं सहभागी व्हावं...असं आवाहन रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांनी केलं आहे...


एक लेन मार्गिका गेली कुठे?बांधकाम मंत्र्यांचा आश्वासन फोल..एकच संताप.. 

मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली असून खड्ड्यांमुळे या महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे... तर कासू ते इंदापूर दरम्यानचे एक मार्ग्रिका काँक्रीटीकरणाचे काम गणपतीपूर्वी लवकरच पूर्ण होइल आणि कोकणातली चाकर मनी,प्रवाशी नागरिकांचा प्रवास हा सुखकर होईल..फक्त आश्वासन दिले.. राज्याचे बांधकाम मंत्री यांनी अनेकदा पाहणी दौऱ्यावर दौरे संपत नाही मार्ग काही होत नाही त्यात खड्डे काही बूजता बुजत नाही...

खड्डे तात्पुरते बुजवण्याकरिता चक्क डांबर रस्ता पुन्हा हौशेने केला माञ आधीच हाऊस त्यात पडला पाऊस

दरम्यान नवे तंत्र ज्ञानाचा वापर करत एक मार्गिका लवकरच पूर्ण होइल या आश्वासनाला तब्बल महिना उलटून गेला... तर महिन्यात सहा फेऱ्या मंत्री महोदय यांच्या झाल्या तर मार्गिका अद्याप सुकेळी पलीकडे आली नाही... तर इंदापूरहून केवळ रातवडपर्यंत पोहचली तर मागील दोन तीन दिवसांपूर्वी सदरचे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजवण्याकरिता सुकेळी खिंड, खांब,कोलाड, वरसगाव दरम्यान या मार्गावरील पुन्हा चक्क डांबर रस्ता पुन्हा हौशेने केला माञ आधीच हाऊस त्यात पडला आता पाऊस खड्यांची परिस्थिती काही जाईना.. अपघातांची मालिका काही संपे ना त्यामुळें अधिक प्रवाशी वर्गातून राज्याचा बांधकाम मंत्र्यांनी या मार्गाचा दिलेले आश्वासन हे फोल ठरले आहे त्यामुळे याबाबत संताप व्यक्त केला जात आहे...

Post a Comment

Previous Post Next Post