सिकंदर आंबोणकर प्रतिनिधी माणगाव
अनंत गीते यांच्या हस्ते वाळवटी गण सहसंघटक पदी महेश सुर्वे यांची निवड
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाळवटी गणाच्या ता.श्रीवर्धन 'सहसंघटक' पदाचे नियुक्ती पत्र महेश सुर्वे यांना दि.३१/०८/२०२३ रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय दादर,मुंबई येथील शिवसेना भवन येथे शिवसेना नेते अनंत गीते यांच्या हस्ते देण्यात आले...त्या प्रसंगी द.रायगड संपर्क प्रमुख संजय कदम, श्रीवर्धन विधानसभा संपर्कप्रमुख सुजित तांदळेकर,गणेश निर्मल,संजय कोबनाक, योगेश गायकर,दिलीप कर्देकर,मधुकर ठसाळ पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते...
वाळवटी गणामधील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य
त्यांच्या निवडीने वाळवटी गणामधील शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून वाळवटीगण, विभागामधून तसेच श्रीवर्धन तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे...

