महाराष्ट्र वेदभुमी

आगमन गणरायाचे...भाव लागू दे त्या चरणा




🌾🍁🌾🍁🙏लेख 🙏🌾🍁🌾🍁
          तळवली रोहा (नंदु तेलंगे)

मंगळवार दिं.१९/९/२०२३ श्री गणरायाच आगमन होत आहे. गणपती बाप्पा आपल्याच गावात येत आहे असे नाही तर आपल्या  भारतदेशा व्यतीरीक्त जगातील अनेक देशात श्री गणेशाचं आगमन होणार आहे...मंगलमुर्ती ही बुद्धीची देवता आहे...हा उत्सव प्रतीवर्षी येणारा हिन्दु संस्कृतीमध्ये महत्वाचा सण मानला जातो प्रत्येक कुटुंबाचा या उत्सवाकडे पहाण्याचा दृष्टीकोन वेगळा  आहे...आपण देवाला आपल्या घरामध्ये आणताना आपली एक इच्छा असते आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी पण देवाची पण अपेक्षा असते...देवाचा एक स्वभाव आहे...

घेशी तेव्हा देशी / ऐसा असशी उदार //

आपण त्याला पहिल्यांदा दिले पाहीजे...आपण देताना त्याच्या आवडीचा विचार केला पाहीजे...

आवडे देवाशी तो ऐका प्रकार/ नामाचा उच्चार रात्रंदिवस// 

आता आपल्या मनालाच आपण विचारा श्री गणरायासमोर रात्रंदिवस काय करतो...नको नको ते गाणं ,नको नको ते नाचणं ,नको नको ते गाणं नको नको ते खाण , नको नको ते पिणं ,नको नको ते खेळणं,अरे अरे गणपती बाप्पाला नाही हो आवडत पण करणार काय गप्प बसावे लागते...तो याचा बदला वेळ आल्यावर घेतो... आणि ज्यावेळेस आपल्यावर संकट येते तेव्हा आपण श्रीगणेशाची प्रार्थना करतो...मला या संकटातुन बाहेर काढ...बाप्पा म्हणतो मला घरी बोलावुन माझी अवहेलना केलीस...आता केल्या कर्माची फळं भोगायला तयार रहा...तरुणांना हात जोडुन विनंती आहे... सदविवेक बूद्धीने वागा...बाप्पासमोर बसा... अथर्व शिर्ष सामुदायिक पणे पठण करा... समोर दुर्वांकुराचा ताट घ्या एक एक दुर्वांकुर वाहुन ॐ गंग  गणपतये नम: असा सहस्त्र नामाचा जप करा....तेवढं शक्य नाही तर दररोज १०१ तरी दुर्वा वहा तुमचं जिवन सुजलाम सुफलाम होईल...आम्हाला एवढ्या दुर्वा काढायला वेळ नाही...मग आसन घाला 

ठायीच बैसोनी करा एक चित्त / आवडी अनंत आळवावा//

वरील नामाचा जप करा...बाप्पा प्रसन्न होऊन तुम्हाला बुद्धी प्रदान करील...असो माझ्या सद्गुरु कृपा आशिर्वादाने चार विचार आपल्या समोर मांडले क्षमस्व ? 

 ☘️🌹आपला सेवक🌹☘️

      नंदु तेलंगे तळवली रोहा..

Post a Comment

Previous Post Next Post