रोहा/शहानवाज मुकादम
अवैध खैराची तोड करुन तस्करी वनविभागाचा मात्र कानाडोळा
तालुक्यातील चणेरा विभाग हा नेहमीच चर्चेत राहीला असुन मोठ्या प्रमाणावर जंगलातून अवैध खैराची तोड करुन तस्करी वन विभागाचा मात्र नेहमीच कानाडोळा होताना दिसत आहे... वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मोबाईल नंबर ही देण्यास टाळाटळ करीत असल्याने वनविभागाच्या संगनमताने खैराची तोड करुन तस्करी केली जात नाही ना ?
उप वनसंरक्षक रोहा व रोहा पोलीस ठाण्यात तक्रार होताच वन विभागाची धावाधाव
दि:१८/९/२०२३ रोजी उप वनसंरक्षक रोहा व रोहा पोलीस ठाण्यात तक्रार होताच वन विभागाची धावाधाव होत असल्याचे समोर आले...चणेराचे वनपाल श्री गायकवाड यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार खांबेरे हद्दीत काहीसा खैराचा माल मिळाला असुन सदरच्या खैराची तोड कोणी केली व कोणाच्या जागेत सदर खैराचा माल मिळाला याबाबत बोलणे टाळले... मुरुड वनक्षेत्रपाल व रोहा उप वनसंरक्षक यांचा मोबाईल नंबर मागितले असता वरीष्ठांकडून नंबर देण्यास मनाई असल्याचे सागितले...अवैध खैर तोडून तस्करी प्रकरणी वनसंरक्षक विभागाकडून सखोल चौकशीकरुन संबंधितावर कारवाई होणे आवश्यक आहे...रोहा-खाडी चेक पोस्ट,तांबडी चेक पोस्ट,आणी मुरुड चेक पोस्ट वर रात्री वन विभागाकडून नाका बंदी केल्यास या खैर तस्करीला आला बसेल...
अनेक शतकांपासून जंगल तोड पाऊस पडत नाही..औषधीयुक्त वनस्पतींची झाल्या दुर्मिळ...
निसर्गाच्या या साखळीत इतकी गुंतागुंतीची चक्रे आहेत, की माणसाला ती चक्रे निर्माण करणे तर सोडाच, पण ती चक्रे दुरूस्त करणेही जमन्यासारखे नाही...गेल्या कित्येक शतकांपासून जंगल तोडले एवढाच उद्योग माणसाने केला आहे...शेतीसाठी, शहरांच्या वाढीसाठी, कारखान्यांना कच्चा माल पुरवण्यासाठी, इंधनासाठी अशा कारणांसाठी आपण जंगल तोडत राहिलो..जंगलतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे...आज सर्व डोंगर, जंगल हे वृक्षतोडीमुळे ओसाड झाले आहेत...औषधीयुक्त वनस्पतींची दुर्मिळता झाली आहे...त्यामुळे पाऊससुद्धा पडत नाही...
बेसुमार जंगलतोडीमुळे प्राणी बेघर मानवी वस्त्यांत बिबट्या घुसल्याच्या नेहमीच घडत घटना
ज्या प्रमाणात जंगलतोड होते त्या प्रमाणात लागवड न झाल्याने निसर्गाच्या या मौल्यवान संपत्तीचा फार मोठा ऱ्हास होत आहे...जो जैविक आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडवत आहे...दगडांच्या खाणींमुळे डोंगर-माथेही उजाड होत आहेत...बेसुमार जंगलतोडीमुळे प्राणी ही बेघर झाले आहेत...आणि ते मानवी वस्त्यांत आसरा शोधत आहेत...त्यामुळे महाराष्ट्रात किंवा इतर प्रदेशात अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांत बिबट्या घुसल्याच्या घटना नेहमीच घडत आहेत...
वृक्षतोडीमुळे ओझन वायूचा थर कमी.. तापमानात वाढ
दिवसेंदिवस होणार्या जंगल तोडीमुळे मातीची धूप,पावसाचे कमी होत जाणारे प्रमाण, वृक्षअभावी येणारे पूर अशा अनेक समस्या जगात जागोजागी भेडसावत आहेत...वृक्षतोडीमुळे ओझन वायूचा थर कमी झाला असून तापमानात मोठया प्रमाणात वाढ होत आहे...
