🌾☘️🌿🏵️लेख श्रीकांत जंगम रोहा🏵️ 🌿☘️🌾
पूर्वापार चालत आलेली आपली परंपरा,गौरी गणपतीचा सण,एक महान उत्सव
सुखकर्त्या दु:खहर्त्या विनायकाचं आगमन झालं की, अखंड महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण निर्माण होतं.रिमझिम बरसणा-या श्रावणसरी माहेरवासिणी सारख्या भादव्याच्या सणाला निघून जातात... बाप्पाच्या येण्याने सारं वातावरणं चैतन्यमय होऊन जात...हिरवेगार झालेलं डोंगर जणु काही हिरव्या मखमली पायघड्या घालताना भासतात....खळखळणा-या नदी नाल्यांची अभिषेक घालण्यासाठीची पळापळ चालु असते..स्वर्गादी देवदेवता जणु…अमृताचा कुंभ सह्याद्रीच्या माथ्यावरून कोसळणा-या जलप्रपाताच्या रूपाने रिता करत असतात..फुलझाडांनी सजलेले रानं रंगाची उधळण करत असतात...धुक्याची दुलई बाजूला सारत सूर्यनारायणच्या कोवळ्या किरणांनी सृष्टी सोनेरी पितांबराप्रमाणे सुवर्णमय होऊन जाते...ऊन-पावसाच्या खेळात सुरू असणा-या लपंडावात आकाशीचा इंद्रधनुष्य बाप्पाच्या आगमनाची सप्तरंगातुन स्वागताची कमानं निर्माण करत असतो.…खरं तर बाप्पा येण्याच्या आगमाची आतुरता सा-या विश्वालाच असते...दरवर्षीप्रमाणे………!
पूर्वापार चालत आलेली आपली ही परंपरा आजतागायत समाज तो प्राणपणाने जपत आला आहे...श्रावण संपताच भाद्रपद चतुर्थीला वाजत-गाजत गणरायाला एखाद्या राजासारखं आणुन सिंहासनावर विराजमान केलं जात...त्याची विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठापणा केली जाते...आरती-पखवाज-शंखाच्या नादाने आणि धुपारत्यांच्या सुंगधाने घरामध्ये एक वेगळीच उर्जा या आनंदाच्या क्षणी निर्माण होते...कुणाकडे दिड-दिवस,पाच दिवस तर कोणाकडे अनंत चतुर्थीपर्यत घरं कस गजबजलेलं असतं... पै-पाहुणे,मिञमंडळी दर्शनासाठी येत असतात...गौरी आल्या की आंनदाला पारावार उरत नाही तो खास करून माहेरवाशीणींना, एक वेगळीच ओढ,एक वेगळाच आनंद..!त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि शांतता असते...
गौरी गणपती हा आपला पारंपारिक सण,जिकडे तिकडे गौरी गणपतीची गाणी तुमच्या कानावर पडत असतात,सर्वात आनंदाचा आणि मोठा सण म्हणजे गौरी गणपतीचाचं,कारण कोकणात या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे ,शहरात राहणारा कोणताही चाजरमानी या सणासाठी जिवाचा आटा पिटा करणार पण, सणासाठी सुट्या काढून गावी येणार म्हणजे येणार कारण,वर्ष भर रोजच्या व्यापातून आपल्या माणसाला, आपल्या सग्यासोय-याना भेटण्याचा हा सण,ओढ असतेच अनोखी भेटण्याची.. हा सण जवळ आला की, जास्त लगबग सुरू होते ती,सासुरवासिणीला माहेरी येण्याची...
आज काळ बदलायला लागलाय,काही काळापुर्वी माहेरला जायचं म्हणजे ठराविक कारणासाठी, आणि आज आपल्याकडे ब-याच गोष्टी आल्यामुळे, आपलं माहेर किंवा आपली माणसं दुर न वाटता खुपच जवळ असल्यासारखी वाटतात...
पूर्वी सण आला की, भाऊ बहिणीला आणयाला जायचा ( माघारी आलाय अस म्हणायची पद्धत होती) आणि ती बहिण सुद्धा भावाची आतुरतेने डोळे लाऊन वाट पाहायची,पण आज ती वाट बघावी लागत नाही, सोई सुविधा साधनं वाढली, पण माहेरी येण्याची ओढ माञ कमी झाली नसल्याचे आज ही परंपरा आहे...
आजच्या या धावपळीच्या युगात घर, संसार, मुलं आणि त्यात स्वतःच्या पायावर उभं राहून जी काही या माहेरवाशीणींची तारंबळ उडत असते, मग त्यातुन ही स्वतःला सावरत, माहेरी जाण्याची तगमग किंवा ओढ कायम असते, आणि हा गौरी गणपती सण असाच आहे की, या दिवसासाठी जीवाचं रानं करीत या सासुरवासिणी माहेरी धाव घेतात , आणि हीच तर या धार्मिक आणि महत्वपर्ण सणाची गोडी आहे , म्हणजेच आपुलकीचा सण...!
काही काळापुर्वी सगळे भाऊबंद एकञ गुण्यागोविदानं राहायचे, कोणाचीही तक्रार नसायची, या उलट जास्त जिव्हाळा असायचा...
सणाच्या निमित्ताने का होईना ,सगळे आप्तजण एकञ यावेत यासाठी एकञ बाप्पाला आणलं जात होतं...आज काळ बदलला,एकञ कुटुंबच तुरळक होत चालली आहे,तो प्रेम, तो जिव्हाळा, कुठं तरी हरवलाय हे बदलत्या काळात पहावयास मिळत आहे...
चला, तोच सण, तोच उत्सव, आणि प्रेम, जिव्हाळा, पुन्हा वाढवुया आणि आपला सण,आपला उत्सव आनंदाने आणि एकोप्याने साजरा करू या, आणि हो,नात्यांना समजून घ्यायला,खात्यांना वेळ द्यायला जगात आपल्या सणांसारखे सण दुस-या संस्कृतीत आहेत तरी कुठं.?आपला सण..! आपला उत्सव..!
गौरी -गणपती सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!!
✍️श्रीकांत जंगम ✍️
रोहा
