महाराष्ट्र वेदभुमी

ऐन गणेशोत्सवात कारखानदाराची ग्रामस्थांनी केली कोंडी; याबाबत मुरुड तहसीलकडे न्याय मागता देण्यास उदासीनता


मुरुड: १२ सप्टे २०२३,न्यूज ब्युरो

हालाखीच्या परिस्थीतीतून कुटुंब उदारनिर्वाह करीत  मच्छीहोडीचा खलासी व कुटूंबाच्या सहकार्याने केली गणपती कारखाण्याची सुरवात 


मुरुड तालुक्यातील  चंद्रकांत रघुनाथ बुल्लु रा.खारदोडकले कोळीवाडा पो.ऊसरोली ता मुरुड येथील रहिवासी असुन ते तसे मागासवर्गीय कुटुंबातील सद्गृहस्थ आहेत.. अत्यंत हालाखीच्या परिस्थीतीतून कुटुंब उदारनिर्वाह करीत त्यांनी मच्छी होडीचा खलासी तसेच गणपती कारखाण्यातील मजूर काम करत आज कुटूंबातील  मुलांच्या सहकार्याने स्वतःच्या गणपती  कारखाण्याची सुरवात केली...जनसामान्यात त्यांचे अतिशय प्रामाणिक संबंधातून त्याच्याकडे कारखाणी व्यावसायात गणेशमूर्तीची वाढ झाल्याने उसरोली या गावी काही वर्षांपूर्वी गट नंबर ३५ मध्ये त्यांनी काही गुठे जागा कायम स्वरुपी विकत घेऊन तेथे छोटेखानी शेड तयार करून गणपती व इतर शोभिवंत वस्तूंची निर्मिती केली....


उसरोली ग्रामस्थांचा संगमत करून या कुटूंबाला उधवस्त करण्याच्या दृष्ट हेतू..तार कुंपण करून मार्ग केला बंद

गेली सात ते आठ वर्षे नित्य नियमाने ते काम करत आहेत...आणि त्या कारखान्यात येजा करण्यासाठी मालवाहतूकीचा खुला रस्ता सरकारी गट नंबर ३६ मधून होता...हा कारखाना मुख्य रस्ता सुपेगाव - मुरुड याला फक्त दहा ते पंधरा मिटर इतक्या अंतराचे आहे... मात्र ०५/०५/२०२० रोजी मौजे उसरोली येथील काही ग्रामस्थांनी संगमताने कुटकारस्थान करून एका मागासवर्गीय कुटूंबाला पुर्ता उध्वस्त करण्याच्या दृष्ट हेतूने तेथे तार कुंपण करून ती सरकारी जागा बंदीस्त करून त्या जागेमध्ये लहानमुलाची हेतूपुरस्सर खेळणी नाममात्र लावलेली आहेत.यामुळे गणपती कारखानदार चंद्रकांत र.बुल्लु व त्यांच्या कुटुंबीयांना तेथे जाणे येणे किंवा कच्चा माल वाहतूक तसेच तयार झालेल्या गणपतीच्या मोठमोठ्या मुर्त्या हलवणे अवघड झाले आहे...

तक्रार केल्यानंतर अनाधिकृत अतिक्रमण हलवण्याचा निकाल पारित झाला असताना निर्देश आदेश  प्रक्रिया मंदावली का?

प्रत्यक्षात तक्रार तहसीलदार कार्यालयात लेखी स्वरूपात त्यांचे चिरंजीव रोहन चंद्रकांत बुल्लु यांनी काही महिन्यांपूर्वी दिली आहे...त्या तक्रारीवर मा.तहसिलदार यांनी मौजे उसरोली तळाठी सजा,  मंडळ अधिकारीमार्फत अहवाल मागवून शहानिशा केली...आणि चांगल्या प्रकारे शासननिर्णयाच्या आधारावर संबधीतांना तीनवेळा नोटीस धाडून शासनाच्या जागेत केलेले  अनाधिकृत अतिक्रमण हलवण्याचा निकाल माननीय सुप्रिम व हायकोर्टाचा २०२२ प्रमाणे, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी यांना कार्यवाही करीता पारित झालेला आदेश  तत्कालीन जिल्हाधिकारी  मा. महेंद्र कल्याणकर यांनी तसे निर्देश रायगड जिल्ह्यातील सर्व तहसील यांना दिल्याचे माहिती अधिकार अर्जान्वये प्राप्त झालेली आहेत.असे असतांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६चे कलम ५० प्रमाणे कारवाई होण गरजेच आहे..आणि त्याच अनुषंगाने मा.तहसीलदार मुरुड जंजिरा यांनी या प्रकरणी संबंधितांना नोटीसी सुद्धा दिल्या... मात्र तसे कोर्टांचे निकाल,वरीष्ठांचे निर्देश आदेश असतानाही प्रक्रिया का मंदावली असे तर्कवितर्कांना मुरुडमध्ये उधाण आले आहे...



कारवाई करण्यासंबंधी शोमॅच होती का..? ही बाब अजूनही गुलदस्त्यात..अत्यंत शोकांतिका

कारवाई करण्यासंबंधी शोमॅच होती का..? की नवा अध्यादेश पारित झाला ही बाब अजूनही गुलदस्त्यात आहे...आज हिंदू धर्माचा विशेषतः कोकणातील कोकणवासीयांना आवडीचा आनंदाचा गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला असून मोठमोठ्या गणपतींच्या मुर्त्या लांबवरच्या लोकांना सुरक्षित कारणाने ते लवकर नेत असतात...अशा परिस्थितीत कारखानदार आपल्या कारखान्यातील सुबक तयार मुर्त्या देत  असतांना गणेश भक्त मात्र सुव्यस्थेत तेथून नेवू शकत नाहीत ही अत्यंत शोकांतिका आहेच...कारण अद्याप रस्ताच खुला केलेला नाही...सर्व चर्चा मिटींगवर मिटींग झाल्या...मात्र शासनाच्या जागेत गावपुढाऱ्यांनी केलेली अडवणूक मात्र हलवलेली दिसत नसल्याने  गणपती नेण्याकरीता दुसरा कोणताच मार्ग येथे उरला  नसल्याने गणपती नेणारे गणेश भक्त गणपती नेणार तरी कसे..?


कारखानदाराच्या कोंडीस तहसीलदारांनी न्याय न दिल्यास  हिंदू धर्मांच्या उत्सवाचा तांडव तहसील कार्यालयासमोर ...गणेशभक्त

आताच मुंबई, ठाणे, पनवेल, रोहा, अलिबाग तसेच मुरुड तालुक्यांतील गावातील शहरातील ऑर्डरचे गणपती नेणारी गणेशभक्त मंडळी तांडव करत आहेत...गणपती कारखानदार चंद्रकांत बुल्लु ,रोहन बुल्लु हे स्वतः तेथील परिस्थिती येणाऱ्यांना दाखवतात...गणपतीची कामे पुर्ण आहेत मुख्य रहदारीचा रस्ता अडविल्यान मूर्ती देता येत नाही...तरी मेहेरबान  तहसीलदार मुरुड यांनी याबाबत शुद्ध विचार करून येत्या दोन दिवसांत काय तो मार्ग काढला तर ठिक अन्यथा हजोरोंचे गणपती या ग्रामस्थांच्या आरदांड कृत्याने तेथेच रहातील...आणि याचा फटका गणेश भक्तांना सहन होणारा नसेल असे भक्तगण व्यथीत होऊन बोलत होते...तरी कारखानदाराची कोंडीला तहसीलदार यांनी न्याय देण्यास उदासीनता करु नये...अन्यथा हिंदू धर्मांच्या उत्सवाचा तांडव तहसील कार्यालयासमोर सुरू झाल्याखेरिज रहाणार नाही...अशी चंद्रकांत बुल्लु यांच्या कारखान्यात येऊन निराशेने परत जाणारे गणपती नेणारे गणेश भक्त बोलतांना दिसत आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post