महाराष्ट्र वेदभुमी

प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले तर JNPT, सिडको सर्व मॅनेजमेंटला झुकावेच लागते...काॅ.भूषण पाटील



विशेष प्रतिनिधी उरण  

सिडको भवनात ठीया आंदोलन


बुधवार दिनांक १/९/२०२३ सिडको भवनात  सिडकोसह व्यवस्थापकीय संचालक श्री.कैलास शिंदे साहेब व JNPT डी वाय चेअरमन श्री. उन्मेष वाघ साहेब यांनी JNPT १२.५% जमीन वाटत बाबतीत दुपारी २:३० वाजता मिटींग बोलाविली होती...याअगोदर सुद्धा अशीच मिटींग बोलावून पुढे ढकलण्यात आली होती...मला त्यांनी कळविले होते पण काहीही झाले व कितीही वेळ झाला तरी आज मिटींग करायचीच या निर्धाराने गेलो होतो...तेथे जाऊन कॅबिन बाहेर प्रचंड गदारोळ केला...कितीही तास लागो ,तेथ ठीया मारून बसायचे असे ठरले. शेवटी  सिडको एम् डी श्री.अनिल दिग्गीकर यांनी मी तूमच्यासोबत शुक्रवारी मिटींग घेतो असे फोनवर सांगितले...पण आम्ही हट्ट धरला..आम्हाला आजच मिटींग पाहिजे...शेवटी संध्याकाळी ६ वाजता मुंबईहून श्री.कैलास शिंदे साहेब आले, डी वाय चेअरमन श्री. उन्मेष वाघ यांनी VC वरून मिटींग जाॅईन करण्याचे मान्य केले.JNPT चिफ मॅनेजर श्रीमती मनिषा जाधव मॅडम व सिडकोचे सर्व अधिकारी आले JNPT १२.५% बाबतित यशस्वी चर्चा केली... प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले तर JNPT, सिडको सर्व  मॅनेजमेंटला झुकावेच लागते...काॅ.भूषण पाटील



Post a Comment

Previous Post Next Post