यशवंत ग्रामपंचायत धाटाव हद्दीत गेली काही महिने धाटाव परिसरात वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या झुंडच्या झुंड
रोहा धाटाव प्रतिनिधी अनंता म्हसकर
यशवंत ग्रामपंचायत धाटावहद्दीमध्ये गेली काही महिने धाटाव परिसरामध्ये वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या झुंड पाहता नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहे येथील स्थानिक ग्रामस्थांनी पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांची धास्तीच घेतलेली आहे.. गल्लीगल्लीतून चौकाचौकामधून गावातील लहान मुले पाहून कुत्रे अंगावर धावून येतात.. शाळेमध्ये जाणाऱ्या लहान मुलांपासून ते कंपनीमध्ये कामावरती जाणाऱ्या मोठ्या माणसांपर्यंत रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांच्या मागून ही भटकी कुत्री अंगावर धावत जाऊन हल्लाच करतात...रस्त्याने दुचाकी स्वराच्या समोर येऊन हुल मारल्यामुळे दुचाकीस्वराचा तोल जाऊन गाडीवरून पडलेल्या अनेक घटना घडल्या आहेत...तसेच गावामधील घरांच्या अंगणातून ही कुत्री मळमूत्र करातात त्यामुळे दुर्गंधी तसेच अस्वच्छतेचा प्रश्नही निर्माण होत आहे..
बेजबाबदार कंपन्या कॅन्टीनमधील शिल्लक खाद्यपदार्थ टाकल्याने भटक्या कुत्र्याना खाद्यपदार्थ आयते...संख्येत वाढ
तसेच सध्या धाटाव एम.आय.डी.सी.परिसरामध्ये अनेक कंपन्या आहेत...त्या कंपन्या आपल्या कॅन्टीनमधील टाकाऊ शिल्लक राहिलेले खाद्यपदार्थ बेजबाबदारपणे कंपनीतून बाहेर टाकले जातात...तसेच काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जातो...आणि त्यातही खाद्यपदार्थ असल्यामुळे मोकाट भटकी कुत्री यांना आयते खाद्य पदार्थ मिळते असल्याने यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे...
ग्रामपंचायतीकडे ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनही जाणीवपूर्वक दूर्लक्ष
गेल्या काही महिन्यापूर्वी धाटाव गावामध्ये एका लहान मुलावर ती चार-पाच कुत्र्यांनी हल्ला केला असून तेथीलच काही गावकरी धावत आल्यामुळे त्या मुलाचे प्राण वाचले...धाटाव ग्रामपंचायत प्रशासनाकडे ग्रामस्थांनी वारंवार भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सतत मागणी करूनसुद्धा ही मागणी पूर्ण होत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली...आत्ता नाही तर मग कधी माणूस मेल्यानंतर बंदोबस्त करणार का? अशी चर्चा सध्या जोरदार होत आहे...
